क्रीडा

बटलरच्या फटकेबाजीनंतरही राजस्थानचा पराभव

वृत्तसंस्था

आयपीएल 2019 : जयपूर : स्टिव्ह स्मिथच्या पुनरागमनाने उत्सुकता ताणलेल्या सामन्यात सारी हवा ख्रिस गेल आणि जॉस बटलरच करुन गेले. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानची झुंज अपयशी पडली आणि पंजाबचा 14 धावांनी विजय झाला. 

ख्रिस गेल आणि सर्फराज खान यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने राजस्थानला 185 धावांचे आव्हान दिले. राजस्थानच्या फलंदाजीची खेली पाहता हे आव्हान काहीच मोठे नव्हते. मात्र, मोठी भागीदारी रचण्यात अपयश आल्याने राजस्थानचा पराभव झाला. 

यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात रहाणेने सलामीला फलंदाजी करणे पसंत केले. राजस्थानला अपेक्षित असलेली सुरवात जॉस बटलर आणि स्टीव्ह स्मिथ देऊ शकले असते मात्र, रहाणेने स्वत: सलामीला येणे पंसत केले. त्याने पहिल्याच षटकात सॅम करनला सलग तीन चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र अश्विनने त्याला 27 धावांवर बाद केले. 

राजस्थानकडून जॉस बटलने आणि त्याने चांगली सुरवात केली मात्र नंतर राजस्थानचा डाव गडगडला. पुनरागमन करणाऱ्या स्मिथलाही छाप पाडता आली नाही. सॅम करनने 17 व्या षटकात स्मिथ आणि संजू सॅमसनला बाद केले. त्यापाठोपाठ बेन स्टोक्सही बाद झाला आणि राजस्थानच्या आशा संपुष्टात आल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT