Ramiz Raja Advice Babar Azam To Select T20 Players
Ramiz Raja Advice Babar Azam To Select T20 Players  esakal
क्रीडा

Ramiz Raja : कसोटीसाठी टी 20 चा संघ निवड... रमीझ राजांचा बाबरला अजब सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

Ramiz Raja Advice Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांनी इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर नवे अजब वक्तव्य केले आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानचा 74 धावांनची पराभव केला होता. इंग्लंडने पहिल्याच दिवशी 506 धावा चोपत आक्रमक रणनितीचे दर्शन घडवले.

पहिल्या कसोटीत बॅझबॉल नावावे प्रसिद्ध असलेली ही कसोटी खेळण्याची पद्धत इंग्लंडच्या चांगलीच पथ्यावर पडली. त्यांनी आपला दुसरा डाव लवकर घोषित करत धोका पत्करला. मात्र त्यांना पाकिस्तानचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात गुंडाळण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. पाकिस्तानने ड्रॉ होणारी कसोटी गमावली. यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली.

मात्र दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने आक्रमक खेळ करत इंग्लंडला पहिल्या दिवशीच 281 धावात गुंडाळले. पाकिस्तानकडून पदार्पण करणारा मिस्ट्री स्पिनर अब्रार अहमदने तब्बल 7 विकेट्स घेतल्या. दरम्यान, पीसीबीचे चेअरमन रमीझ राजांचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. रमीझ राजा स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, 'इंग्लंड 5 दिवसाच्या सामन्यात टी 20 खेळत आहे. त्यामुळे मी बाबरला सल्ला दिला की तू संघात टी 20 खेळाडू निवडलेस तर ते फायद्याचे ठरेल. हा नाईलाजाने घेतलेला निर्णय आहे. मात्र मला मानसिकता आवडली.'

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जरी पाकिस्तानने आघाडी घेतली होती तरी आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत सामन्यावर पुन्हा आपली पकड निर्माण केली आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव 202 धावात गुंडाळला. इंग्लंडकडून जॅक लिचने 4 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून बाबार आझमने सर्वाधिक 75 तर साऊद शकीलने 63 धावा केल्या.

यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 79 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात 5 बाद 202 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडे सध्या 281 धावांची आघाडी आहे. इंग्लंडकडून बेन डकेटने 79 तर हॅरी ब्रुकने नाबाद 74 धावा केल्या. पाकिस्तानकडून पुन्हा अब्रार अहमदने 3 विकेट घेतल्या. तो आता पाकिस्तानकडून पदार्पणातच 10 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT