Mumbai Sarfaraz khan smashed a double century
Mumbai Sarfaraz khan smashed a double century  Sakal
क्रीडा

Video : सरफराजचं द्विशतक! मेगा लिलावात मिळाली होती कवडी मोलाची किंमत

सुशांत जाधव

Ranji Trophy 2022 : रणजी ट्रॉफी स्पर्धेत सरफराज खान याने द्विशतकी धमाका केला. (Sarfaraz Khan Double-century) मुंबईच्या मध्यफळीतील खेळाडूनं दुसऱ्या दिवशीच्या खेळात द्विशतकाला गवसणी घातली. मागील 9 डावातील त्याचे हे दुसरे अर्धशतक आहे. रणजीत त्याच्या नावे एका त्रिशतकाचीही नोंद आहे.

मुंबई (Mumbai) संघाने अवघ्या 44 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. मोक्याच्या क्षणी सरफराज खान (Sarfaraz Khan) याने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. कर्णधार पृथ्वी शॉ अवघी 1 धाव करुन माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि सरफराजनं मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी 252 धावांच भागीदारी केली.

रहाणेनं 290 चेंडूत 129 धावा कुटल्या. यात त्याने 17 चौकार आणि 2 षटकार खेचले. सरफराजने सुरुवात हळू केली. पण सेट झाल्यावर तो सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला. पहिल्या दिवशी शतक पूर्ण करणाऱ्या सरफराजने दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केले. मागील 6 रणजी सामन्यात सरफराजने 928 धावा केल्या आहेत. या सामन्या त्याने 154 पेक्षा अधिक सरासरीनं धावा केल्या आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. पण सरफराज खान याला काही मोठा भाव मिळाला नाही. दिल्ली कॅपिटल्सनं त्याला 20 लाख या मूळ किंमतीतच खरेदी केलं होते.

अजिंक्य रहाणेंच शतक आणि त्यानंतर सरफराजनं केलेल्या द्विशतकी धमाक्याच्या जोरावर मुंबईनं दुसऱ्या दिवशी 400 धावांचा टप्पा पार केला आहे. सरफराज खान 214* धावांर खेळत होता. दिवसभरात तो या धावसंख्ये किती भर घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT