Olympian Khashaba Jadhav esakal
क्रीडा

आर्मी क्रीडांगणाला नीरज चोप्राचं नाव, मग खाशाबांवर अन्याय का?

खाशाबांचे नाव वापरुन बोगस पुरस्कार देणाऱ्यांवर कारवाई करा

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म विभूषण मिळावा, खाशाबा जाधव यांच्या नावाने होत असलेल्या राष्ट्रीय कुस्ती संकुलास निधी उपलब्ध व्हावा, खाशाबांचे नाव वापरुन बोगस पुरस्कार देणाऱ्यांवर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज त्यांचे पुत्र रणजीत जाधव व कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने आज येथे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

कऱ्हाडातील कार्वे नाक्यावरील खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस्तंभास अभिवादन करुन आंदोलनास प्रारंभ करण्यात आला.

कऱ्हाड शहरातील कार्वे नाक्यावरील खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस्तंभास अभिवादन करुन आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्मृतीस्तंभासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. जाधव म्हणाले, ज्या सुपुत्राने भारताचे नाव ७० वर्षांपूर्वी जगाच्या नकाशावर कोरले त्यांना अजूनही मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झालेला नाही. राज्य शासनाने केंद्र डावलणार नाही असे नाव पाठवावे. शासनाने खाशाबा जाधव यांच्या जन्मभूमीत कुस्ती संकुल उभे करण्याची घोषणा केलीय. त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, १० वर्षे कंपाऊंडचेच काम सुरु आहे.

शासनाने एका वर्षाच्या आत कुस्ती संकुल पूर्ण करावे, हीच त्यांना आदरांजली ठरेल. नीरज चोप्राने आपल्या देशाचे नाव जगात गाजवले. त्याच्या या कामगिरीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी आर्मीच्या क्रीडांगणाला १५ दिवसात त्याचे नाव दिले आहे. मग, खाशाबा जाधव यांच्यावर असा अन्याय का होत आहे? खाशाबा जाधव यांच्या नावाने होणाऱ्या स्पर्धा चार वर्षापासून बंद आहेत. त्या पूर्ववत सुरु कराव्यात. कुस्त्यांची मैदाने कोरोनामुळे बंद केली आहेत. ती पूर्ववत सुरु करावी. त्याचबरोबर खाशाबांच्या नावाने काहीजणांनी बोगस पुरस्कार दिले, त्यातून पैसे गोळा केले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. या सर्व प्रश्नासंदर्भात येत्या पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा त्यांच्या नावाच्या स्मृतीस्तंभासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: 'श्रेयस अय्यर -गंभीरला काढून टाकण्यापेक्षा जरा विचार करा आणि IPL... ', संजय मांजरेकरांची BCCI वर सडकून टीका

Ishwarpur Municipality Politics : गाफील जयंतराव युतीच्या खिंडीत अडकले; जयंत पाटील यांचा 'आनंद' अल्पजीवी ठरला, मुरब्बी राजकारणी कसा राहिला गाफील?

Beed: एटीएमचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

SCROLL FOR NEXT