Virat-Kohli-Ravi-Shastri 
क्रीडा

कोहली पाठोपाठ शास्त्री गुरुजींनी दिले कोच पदावरुन हटण्याचे संकेत

2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर रवी शास्त्रींची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. इंग्लिश दैनिकाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टीवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा संघासोबत राहण्यासाठी कोणतीही धडपड करणार नाही, असे अप्रत्यक्षरित्या सांगितले. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर रवी शास्त्रींची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती.

द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले की, टीम इंडियाने पाच वर्ष कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान राखले. ऑस्ट्रेलियात जाऊन दोन वेळा विजय मिळवला . इंग्लंडमध्ये इंग्लंडला पराभूत करुन दाखवले. टीम इंडियाची कामगिरी सर्वोत्तम अशीच आहे. कोरोना काळात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली होती. लॉड्स आणि ओव्हलमधील कामगिरी सर्वोत्तम होती, असेही रवी शास्त्री यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मर्यादित षटकांच्या मालिकेत टीम इंडियाने सर्वच देशांना त्यांच्या घरात जाऊन पराभूत करुन दाखवले. जर आम्ही टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर तो क्षण आमच्यासाठी सोन्याहून पिवळा क्षण असेल. कोरोना काळात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे आणि इंग्लंडला बॅकफूटवर ढकलणे ही माझ्यासाठी 4 दशकातील समाधानकारक कामगिरी आहे.

आगामी टी-20 वर्ल्ड कप भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अखेरचा असेल का? असा प्रश्न रवी शास्त्री यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना शास्त्री म्हणाले की, हो मलाही तेच वाटते. जे साध्य करायचे होते ते साध्य झाले आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली संघाने केलेल्या कामगिरीवर समाधानी आहे. क्रिकेटमधील 4 दशकातील माझ्यासाठी सर्वोत्तम काळ होता, असे म्हणत त्यांनी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा शेवटची असेल, असे संकेत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

SCROLL FOR NEXT