Ravi Shastri Sakal
क्रीडा

शास्त्रींना आठवल्या चुका; थ्रीडी मॅनवरही झाला होता अन्याय

दोन वर्षानंतर शास्त्रींनी सोडले मौन

सुशांत जाधव

भारतीय संघाचे (Team India) माजी मुख्‍य प्रशिक्षक रवी शास्‍त्री (Ravi Shastri) यांनी वर्ल्ड कप 2019 (ICC World Cup 2019) मधील संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात तीन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली होती. हा निर्णय मनाला पटण्याजोगा नव्हता, असे शास्त्रींनी म्हटले आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) च्या नेतृत्वाखालील संघात महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या तिघांना संधी देण्यात आली होती.

टाइम्‍स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्रींनी यावर खंत व्यक्त केली. तीन यष्टीरक्षकांना संधी देण्यापेक्षा अंबाती रायडू (Ambati Rayudu) किंवा श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळायला हवे होते, असेही शास्त्रींनी म्हटले आहे. कोहलीचे नेतृत्व आणि शास्त्रींच्या मार्गदर्शनाखालील टीम इंडियाने इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडच्या संघाने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला स्पर्धेबाहेर केले होते.

रवी शास्‍त्री म्हणाले की, संघ निवडीत माझी कोणतीही भूमिका नसायची. पण ज्यावेळी संघात तीन यष्टीरक्षकांची निवड झाली त्यावेळी नाराज होतो. धोनीसोबत दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतला संघात घेण्यामागचे लॉजिक अजूनही समजले नाही. इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी कर्णधार विराट कोहलीने रायडूला चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून पसंती दिली होती. त्याच्याच खांद्यावर मध्यफळीतील जबाबदारी असेल, असे कोहली म्हणाला होता.

पण आयत्या वेळी अंबाती रायडूला डच्चू देण्यात आला. यावर खुद्द रायडूनंही नाराजी व्यक्त केली होती. वर्ल्ड कपमधील सामने थ्रीडी गॉगल घालून पाहणार असल्याची मिश्किल टिप्पणी त्याने केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: छठपूजा आणि मराठी-परप्रांतीय वादावर राज ठाकरेंचा निशाणा, शिवरायांचा उल्लेख करत म्हणाले...

Dog Bite Treatment: कुत्रा चावल्यानंतर लक्षणांची वाट पाहू नका; तातडीने उपचार घ्या, रिम्समधील तज्ज्ञांचा सल्ला

Microsoft: जगभरात मायक्रोसॉफ्टची सेवा विस्कळीत! ७४ देशांमधील आऊटलुक, टीम्स आणि कोपायलट ठप्प; कोट्यवधी वापरकर्त्यांना फटका

NCP Merger: पडद्यामागे मोठ्या घडामोडी! सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन?, पुण्यात पार्थ पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Latest Marathi News Live Update : नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अदिती तटकरे दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईला रवाना

SCROLL FOR NEXT