Ravi Shastri Says T20 format is not meant for bilateral series restricted to just World Cup esakal
क्रीडा

फुटबॉलचा आदर्श घ्या, द्विपक्षीय टी 20 मालिका बंद करा : शास्त्री

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टी 20 क्रिकेट प्रकार हा दोन आंतरराष्ट्रीय संघांमध्ये मालिका खेळण्यासारखा नाही असे मत व्यक्त केले. टी 20 क्रिकेट (T20 Cricket) स्पर्धा ही वर्ल्डकप पर्यंतच मर्यादित असावी असेही ते म्हणाला.

रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघाचे एक यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक आहेत. त्यांना असे वाटते की फ्रेंजायजी क्रिकेट बरोबर दोन वर्षातून टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) हे टी 20 साठी योग्य आहे. रवी शास्त्रींचे हे वक्तव्य भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी 20 मालिका सुरू होण्यापूर्वीच आले आहे.

रवी शास्त्री म्हणाले की, 'सध्या द्विपक्षीय टी 20 क्रिकेट (Bilateral Series) खूपच होत आहे. मी यापूर्वीही भारतीय संघाचा प्रशिक्षक असतानाही सांगितले होते. मी माझ्या डोळ्याने हे घडताना पाहत होतो. तुम्ही फुटबॉलचा आदर्श घेतला पाहिजे. तुम्ही फक्त वर्ल्डकप खेळाल. द्विपक्षीय टी 20 मालिका कोणाच्या लक्षात राहतात? गेल्या सात वर्षातील मला एकही टी 20 मालिका आठवत नाही.'

शास्त्री पुढे म्हणाले की, 'मला विचाराल तर तुम्ही जगभरात फ्रेंचायजी क्रिकेट खेळा. सर्व देश फ्रेंचायजी क्रिकेट खेळण्यास परवानगी देत आहेत. त्यानंतर तुम्ही प्रत्येक दोन वर्षातून एकदा टी 20 वर्ल्डकप खेळवा.' दरम्यान, आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीच्या प्रसारण हक्काचा लिलाव जून महिन्यात होणार आहे. याबाब आकाश चोप्राला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की, 'मला असे वाटते की पुढच्या काळात एका वर्षात दोन हंगाम होतील. असं नजिकच्या काळातच घडेल.'

रवी शास्त्रींनी या बाबतीत आकाश चोप्राशी सहमती दर्शवली. ते म्हणाले की, ' काय माहित उद्या आयपीएलचे 140 सामने होतील. एका हंगामात 70 दुसऱ्या हंगामात 70 सामने. आयपीएलचा पुढचा प्रवास असा असेल. तुम्हाला जर असे वाटत असेल की हा आयपीएलचा ओव्हर डोस होईल. मात्र भारतात कोणताच ओव्हरडोस नसतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT