Virat Kohli and Ravi Shastri FILE PHOTO
क्रीडा

रवी शास्त्री प्रशिक्षकपद सोडणार? मुंबईकर माजी क्रिकेटर म्हणतो...

विराज भागवत

टी२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्रींचा करार संपुष्टात येणार आहे

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ गेल्या काही वर्षात ICC च्या कोणत्याही स्पर्धांचे विजेतेपद मिळवू शकलेला नाही. २०१९च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये स्पर्धेबाहेर पडावं लागलं. २०२१मध्येही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडिया पराभूत झाली. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष २०२१ मधील टी२० विश्वचषक स्पर्धेकडे आहे. सारे संघ या स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. अशातच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे या स्पर्धेनंतर प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर मुंबईकर माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याने आपलं मत व्यक्त केलं.

"रवी शास्त्री पुढील परिणामांचा विचार करत बसले असतील असं मला वाटत नाही. कारण रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. संघातील खेळाडू उत्तम खेळ करत आहेत. इंग्लंडविरूद्ध भारत १-०ने आघाडीवर आहे. पाऊस पडला नसता तर संघ २-०ने आघाडीवर असता. त्यामुळे रवी शास्त्रींनी प्रशिक्षकपद सोडलं तर संघाचे काय होईल याचा विचार त्यांना नक्कीच सतावत नसेल", असं रोखठोक मत आगरकरने व्यक्त केले.

"रवी शास्त्री यांचा करार टी२० विश्वचषक स्पर्धेपर्यंतच आहे. त्यानंतर त्यांचा करार संपतोय. जर भारतीय संघाने टी २० विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली आणि संघ विजेता झाला, तर मग शास्त्रींना निर्णय घेणं कठीण जाऊ शकेल. अनिल कुंबळे कोच असतानाही प्रशिक्षकपदासाठी अर्ज येतच होते. एखाद्याचा करार संपतोय हे समजल्यावर अर्ज येणं स्वाभाविक आहे. पण त्यावरून तुमच्या कारकिर्दीला ब्रेक लागतोय असं मानण्यात अर्थ नाही. क्रिकेट हा एक असा व्यवसाय आहे जिथे तुमची कामगिरी पाहिली जाते. जर एखाद्याची कामगिरी उत्तम असेल, तर त्या व्यक्तिला त्याच्या स्थानावरून कोणीही हलवू शकत नाही", अशा शब्दांत आगरकरने आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, टी २० विश्वचषक स्पर्धा आता अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत ही स्पर्धा झाल्यावर संघाचे कोच रवी शास्त्री प्रशिक्षकपद सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यासोबतच, BCCIचे अधिकारी एका माजी क्रिकेटपटूशी नवा कोच होण्यासाठी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे टी २० विश्वचषक संपल्यानंतर कदाचित भारतीय संघाला नवा कोच मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT