Ravichandran Ashwin WTC Final  esakal
क्रीडा

Ravichandran Ashwin : माझे कुटुंबीय दुप्पट तणावात... WTC Final नंतर अश्विन मानसिक आघातावर बोलला

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin WTC Final : रविचंद्रन अश्विन हा भारताचा कधीकाळी तीनही फॉरमॅटमधील अव्वल दर्जाचा गोलंदाज होता. मात्र वनडे, टी 20 संघातील त्याचे स्थान डळमळीत होत गेले. आता रविचंद्रन अश्विन हा भारताचा कसोटीपटू म्हणूनच ओळखला जातो. तो सध्या आयसीसीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मात्र त्याला WTC Final साठीच्या भारताच्या अंतिम 11 च्या सामन्यात स्थान मिळाले नाही. यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली. माजी खेळाडूंनी देखील भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.

यानंतर रविचंद्रन अश्विन इंडियन एक्सप्रेसशी बोलताना असे अनेक आघात आपण आणि आपल्या कुटुंबाने सहन केल्याचे सांगितले. याचबरोबर त्याने आपल्यावर लावलेल्या अतीविचारी टॅगबद्दलही प्रतिक्रिया दिली. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अश्विन म्हणाला की, 'अनेक लोकं मला अतीविचारी ठरवतात. ज्या व्यक्तीला सलग 15 ते 20 सामने खेळायला मिळतात तो अतीविचारी असण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीला फक्त त्याला 2 सामनेच खेळायला मिळणार आहेत याची कल्पना असते तो अतीविचारी होऊ शकतो.'

अश्विन म्हणाला की, 'जर मला कोणी सांगितले की, तू 15 सामने खेळणार आहेस. तुझी आम्ही काळजी घेऊ, तुला नेतृत्व गटात स्थान मिळेल तर मी अतीविचारी होणार नाही. मी अतीविचारी का होऊ? एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या प्रवासामुळे अतीविचारी म्हणणं हे न्याय नाही. असा कोणालाच अधिकार नाही.'

अश्विन पुढे म्हणाला की, 'हा टॅग माझ्याविरूद्ध वापरण्यासाठी तयार करण्यात आलाय असं वाटत नाही का? मी म्हणतो की ज्यावेळी माझ्या बाबतीत नेतृत्व करण्याची चर्चा सुरू झाली त्यावेळी लोकांनी अशी वक्तव्य करण्यास सुरूवात केली. त्यावेळी काही लोकं अशी होती ज्यांनी बाहेर सांगण्यास सुरूवात केली की भारत परदेशी दौरा करते त्यावेळी यादीत माझे नाव पहिले नसते.'

'यादीत माझं नाव पहिला आहे की नाही ही गोष्ट माझ्या नियंत्रणात नाही. जर मी ते कमवलं आहे तर ते तिथे असेलच असा माझा विश्वास आहे. मी आधीही बोललो आहे की माझी कोणाविरूद्ध तक्रार नाही. मला मागे बसून टोमणे मारणे किंवा पश्चाताप करत बसण्यासाठी वेळ नाही.'

अश्विनने त्याचे कुटुंबावर देखील कसा आघात होतो हे देखील सांगितले. तो म्हणाला की, 'माझ्या कुटुंबावर याचा किती आघात होतो हे मी पाहिले आहे. माझ्या वडिलांना ह्रदय विकार आणि इतर आरोग्याच्या तक्रारी आहेत.'

'प्रत्येक सामना, प्रत्येक दिवस काही ना काही घडत असते. ते मला कॉल करतात ते तणावात असतात. मी बाहेर असल्याने माझ्यासाठी गोष्टी सोप्या असतात. जाऊन खेळणे हे माझ्या नियंत्रणात असते. मात्र माझ्या वडिलांसाठी तसं नाहीये. मी ज्या तणावातून जातोय त्याच्या दुप्पट तणावातून ते जात असतात. त्यामुळे बाहेरच्या सर्व गोष्टी संयुक्तिकच ठरत नाहीत.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT