Ravindra Jadeja Injury  sakal
क्रीडा

Ravindra Jadeja Injury : 'दुखापतीनंतर या वयात पुनरागमन करणे सोपे नाही' - जडेजा

जडेजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; विश्वकरंडक खेळण्याबाबत अनिश्चितता

सकाळ ऑनलाईन टीम

Ravindra Jadeja Injury : दुखापतीमुळे आशिया करंडकातून बाहेर झालेल्या रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. जडेजाने इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली. लवकरच मी पुनरागमनाच्या तयारीला लागणार आहे, असेही तो म्हणाला.

आशिया करंडकात ‘सुपर-फोर'' फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी जडेजा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही आणि तो स्पर्धेबाहेर गेला आहे, अशी घोषणा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केली होती. जडेजाच्या जागेवर अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळू शकेल की नाही, याविषयी अद्याप निश्चित माहिती नाही. ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून याबद्दल बीसीसीआय, माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, डॉक्टर आणि पाठीराख्यांचे आभार मानतो.

मोसमात जबरदस्त कामगिरी

जडेजाने यंदाच्या मोसमात फलंदाजी आणि गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. यंदा नऊ टी-२० सामन्यात जडेजाने आठ डावांत ५०.२५ च्या सरासरीने २०१ धावा केल्या. नाबाद ४६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्याशिवाय पाच गडीही बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT