Rohit Sharma  esakal
क्रीडा

Rohit Sharma : रविंद्र जडेजाऐवजी अश्विनची निवड; रोहित शर्मानं सांगितलं कारण

डावखुरा रविंद्र जडेजा पहिली पसंती होता. मात्र अश्विनला कशी मिळाली संधी?

अनिरुद्ध संकपाळ

South Africa vs India 1st Test : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे कसोटी मालिका मुकलेल्या मोहम्मद शमीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली आहे. तर फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजा ऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली आहे.

संघ निवडीवेळी डावखुऱ्या रविंद्र जडेजाची दावेदारी प्रबळ होती. मात्र त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने रोहित शर्माने त्याच्या ऐवजी अश्विनला संधी दिली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे. पहिले दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पहिल्या दिवशी ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशीर झाला होता. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ढगाळ वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेकीनंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करावी की गोलंदाजी करावी याबाबत काही सांगता येत नाही. आम्हाला या मैदानावरची परिस्थिती माहिती आहे. आम्ही अनेकवेळा इथे खेळलो आहोत. आम्हाला प्रथम फलंदाजी करताना चांगल्या धावा कराव्या लागती. गोलंदाजांना त्यांचा काम करण्यासाठी काहीतरी द्यावं लागेल.

'खेळपट्टीवर ग्रास आहे, वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे इथं फंलदाजी करणं आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहिती आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेत ज्या ज्यावेळी कसोटी मालिका खेळण्यासाठी येतो त्या त्यावेळी एक आशा घेऊन येतो. गेल्या दोन दौऱ्यात आम्ही इतिहास रचण्याच्या जवळ पोहचलो होतो.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT