Ricky Ponting Rishabh Pant : भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत कार अपघातातून थोडक्यात बचावला होता. मात्र या अपघातामुळे त्याच्या गुडघ्याचे तीन लिगामेंट टिअर झाले होते. त्यामुळे तो पूर्णपणे फिट व्हायला बराच काळ लागणार आहे. तो आयपीएल पाठोपाठ वनडे वर्ल्डकपला देखील मुकणार अशी चर्चा सुरू झाली. या दरम्यान आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉटिंगने एक मोठे वक्तव्य केले आहे.
रिकी पॉटिंगने आयसीसीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांना ऋषभ पंतची रिप्लेसमेंट मिळणे कठिण आहे. आम्हाला एक विकेटकिपर बॅट्समन हवा आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या दृष्टीने ऋषभ पंत अत्यंत महत्वाचा आहे. त्याने याबाबत केलेले वक्तव्य सर्वांच्याच मनाला भावून गेले.
पॉटिंग म्हणाला की, 'मी पंतला माझ्या सोबत डग आऊटमध्ये प्रत्येक दिवस, आठवडे ठेवू इच्छितो. जर तो आयपीएलदरम्यान आमच्यासोबत राहू शकला तर मी त्याला कायम डग आऊटमध्ये ठेवणार. त्याची संघातील उपस्थिती सर्वांना प्रभावित करते.'
पॉटिंग पुढे म्हणाला की, 'तुम्हाला पंतसारख्या खेळाडूचा पर्याय मिळत नाही. या प्रकारचे खेळाडू झाडाला लागलेले नसतात. आम्हाला याबाबत विचार करावा लागले. आम्ही त्याच्या पर्यायाबाबत विचार करत आहोत. आम्हाला एक विकेटकिपर फलंदाज पाहिजे आहे.'
दिल्ली कॅपिटल्स नाही तर टीम इंडियाला देखील ऋषभ पंतची उणीव भासणार आहे. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पंतची उणीव भासणार आहे. ऋषभ पंतच्या दमदार खेळीच्या जोरावरच भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभूत केलं होतं. गाबामध्ये पंतने धडाकेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाकडून सामना आणि मालिका हिसकावून घेतली होती.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.