Rishabh Pant Car Accident
Rishabh Pant Car Accident sakal
क्रीडा

व्हिडिओमध्ये पाहा पंतच्या गाडीचा अपघात किती भीषण होता... थोडक्यात बचावला, कार जळून खाक...

Kiran Mahanavar

Rishabh Pant Car Accident : टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली आणि आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पंतला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत घरी परतत असताना रुरकीजवळ कार अपघात झाला. ताज्या बातम्यांनुसार, त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्या कपाळावर, पाठीवर आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातस्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये ऋषभ पंतची कार वेगात रेलिंगला धडकली आणि आग लागली. या धक्कादायक अपघाताच्या बातमीवर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी आपल्या प्रतिक्रियेत भारतीय क्रिकेटपटूला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.(rishabh pant car accident See in the VIDEO how terrible was the accident of Pant’s car)

तर टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऋषभ पंतच्या बहिणीशी संपर्क साधला आहे. 'आम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहोत', असे सांगितले. ऋषभ हा फायटर आहे आणि तो यावर लवकरच मात करेल. आम्हाला अपघाताची बातमी मिळाली आणि आता आम्ही सर्वजण रुग्णालयात जात आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT