Rohit Sharma and Virat Kohli Get of Month Long Vacation esakal
क्रीडा

IND vs WI : विराट, रोहितला आता आरामच आराम... जैसवाल, रिंकू सिंहला मिळणार संधी?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs WI : इंग्लंडमध्ये झालेल्या WTC Final नंतर आता टीम इंडिया काय करणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका पुढे ढकलण्यात आली असून त्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. त्यामुळे भारतीय संघाला अतिरिक्त सुट्टी मिळाली आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी जवळपास महिनाभर सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडीजमधील टी 20 मालिकेसाठी देखील विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. (Rohit Sharma and Virat Kohli Get of Month Long Vacation)

मिळालेल्या माहितीनुसार वेस्ट इंडीजविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली वेस्ट इंडीजविरूद्धची 3 वनडे सामन्यांची मालिका खेळतील. त्यानंतर त्यांना 5 टी 20 सामन्यासाठी ब्रेक मिळेल.

दुसरीकडे आयपीएल 2023 मध्ये दमदार कामगिरी केलेल्या यशस्वी जैसवाल, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांना टी 20 मध्ये भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी भारत - अफगाणिस्तान मालिकेबाबत कोणती माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे खेळाडूंना एका महिन्याची सुट्टी मिळणार आहे.

भारतीय संघाला या मोठ्या ब्रेकची गरज होती. कारण दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर भारतीय संघ WTC Final ची तयारी करण्यासाठी त्वरित इंग्लंडला रवाना झाला. फायनलमध्ये 5 दिवस चाललेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. त्यानंतर आता भारतीय संघ मायदेशात परतला आहे.

भारतीय संघाचे संभाव्य शेड्युल

  • भारताचा वेस्ट इंडीज दौरा

  • भारत - अफगाणिस्तान मालिका

  • आयर्लंडविरूद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका

  • आशिया कप

  • भारत - ऑस्ट्रेलिया 3 वनडे सामन्यांची मालिका

  • वनडे वर्ल्डकपची तयारी

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

SCROLL FOR NEXT