Rohit Sharma  esakal
क्रीडा

Rohit Sharma | रोहित शर्मा टी 20 मध्ये 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार

अनिरुद्ध संकपाळ

साऊथहम्पटन : इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्या भारताने 50 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात हार्दिक पांड्याने फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजीत कमाल करत मोठा वाटा उचलला. त्याने 51 धावांची खेळी करत 4 विकेटही घेतल्या. याचबरोबर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील कॅप्टन्सीचे (Captain) एक वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) आपल्या नावावर केले. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात सलग 13 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

रोहित शर्माने अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचे सलग 12 सामने जिंकण्याचा विक्रम मागे टाकला. आता सलग टी 20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत 13 विजय मिळवणारा रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर अफगाणिस्तानच्या असगर अफगाण याचा दुसरा क्रमांक लागतो. त्या पाठोपाठ सलग 11 विजय मिळवणाऱ्या रोमानियाचा रमेश सतीनस हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सामन्याबाबत बोलायचे झाले तर भारताच्या विजयात हार्दिक पांड्याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने 33 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचे हे टी 20 क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. याचबरोबर भारताकडून सूर्य कुमार यादवने 39 तर दीपक हुड्डाने 33 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. भारताने 20 षटकात 8 बाद 198 धावांपर्यंत मजल मारली.

भारताचे 199 धावांचे हे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच धक्के दिले. त्यांचा संपूर्ण संघ 19.3 षटकात 148 धावात गारद झाला. यात देखील हार्दिक पांड्याने मोठा वाटा उचलला. त्याने इंग्लंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. इंग्लंडकडून मोईन अलीने 36 तर हॅरी ब्रुक्सने 28 धावांची खेळी केली. पांड्याबरोबर पदार्पण करणाऱ्या अर्शदीप सिंह आणि युझवेंद्र चलहने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT