Rishabh-Pant 
क्रीडा

भारतीय फलंदाजांनी केली इंग्लंडची धुलाई; दिलं डोंगराएवढं आव्हान

विराज भागवत

Ind vs Eng 4th Test Live Updates: रोहितचे शतक; पुजारा, शार्दूल, पंतची अर्धशतके

Ind vs Eng 4th Test India Live Updates 2nd Innings: सलामीवीर रोहित शर्माचे धडाकेबाज शतक आणि चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर व ऋषभ पंतची अर्धशतके यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. विराट कोहलीनेही ४४ धावांची खेळी केली, तर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या दोघांनी शेवटच्या घडीला फटकेबाजी करत बहुमूल्य धावा जोडल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ३, रॉबिन्सन आणि मोईन अलीने २-२ तर अँडरसन, ओव्हरटन आणि जो रूटने प्रत्येकी १ बळी टिपला.

भारताचा पहिला डाव १९१ वर तर इंग्लंडचा पहिला डाव २९० वर आटोपला. इंग्लंडने घेतलेल्या ९९ धावांच्या आघाडीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली. लोकेश राहुलने ४६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा जोडीने १५०+ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. रोहितने दमदार शतक (१२७) तर पुजाराने झुंजार अर्धशतक (६१) ठोकले.

चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांनी थोडाशा चुका केल्या. पहिल्या सत्रात भारताने तीन बड्या खेळाडूंच्या विकेट्स गमावल्या. रविंद्र जाडेजा (९) आणि अजिंक्य रहाणे (०) दोघेही ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाले. नंतर विराट ९६ चेंडूत ४४ धावा काढून बाद झाला. मग शार्दूल-पंत जोडीने ही आघाडी पुढे वाढवली. ऋषभ पंत (५०) आणि शार्दूल ठाकूर (६०) या दोघांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराह (२४) आणि उमेश यादव (२५) या दोघांनी भारताला ४६६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT