T20 World Cup India vs Pakistan  
क्रीडा

T20 World Cup : भारत-पाक कर्णधारांमध्ये चर्चा फक्त घर, गाडी बंगल्याचीच!

भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला

Kiran Mahanavar

T20 World Cup India vs Pakistan : टी-20 विश्वचषकचा थरार रंगण्यासाठी अवघे काही तास बाकी आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. मात्र टी-20 विश्वचषक पूर्वी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांचे कर्णधार एकत्र दिसले. सर्वांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा वाढदिवसही साजरा केला. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटल्यावर काय बोलतात हे सांगितले.

रोहित म्हणाला, जेव्हा आशिया चषकादरम्यान आम्ही पाकिस्तानला भेटलो तेव्हा आम्ही आमच्या कुटुंबाबद्दल, जीवनाबद्दल आणि आमच्याकडे कोणत्या गाड्या आहेत याबद्दल बोलत होतो. आम्हाला त्यांच्याविरुद्ध खेळण्याचे महत्त्व समजते, परंतु ते नेहमीच आहे. याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. आशिया चषकादरम्यान रोहितने बाबरला तू लग्न कधी करणार आहे, असे विचारले होते. याला उत्तर देताना बाबर म्हणाले होते की, सध्या तरी नाही.

बाबर आझम यावर म्हणाला की, तो (रोहित शर्मा) माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. मी त्याच्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करतो. कारण तो खूप खेळला आहे. आपण जितके जास्त शिकू तितके आमच्यासाठी चांगले. बाबर आझम आणि विराट कोहलीही खूप चांगले मित्र आहेत. विराटच्या वाईट अवस्थेत बाबरने ट्विट केले आणि लिहिले की, ही वेळही निघून जाईल आणि कोहलीनेही त्याला प्रतिक्रिया दिली होती.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघ

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , अर्शदीप सिंह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Doctor Case : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन; फरार आरोपींचा शोध सुरु

Mumbai Crime: मुंबईत दिवसाढवळ्या थरार! जीव मुठीत घेऊन रस्त्यावर पळत सुटली पण...; प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य

Shreyas Iyer ने कसोटी क्रिकेटमधून का घेतला ब्रेक? अखेर स्वत:च सांगितलं नेमकं खरं कारण काय

Mumbai News: विरार ते मरीन ड्राइव्ह आता नॉन-स्टॉप! सी लिंक प्रकल्पाला 'पर्यावरण'ची अंतिम मंजुरी

Female Doctor Case: पीएसआय आणि अन्य आरोपीनं महिला डॉक्टरचा छळ का केला? पीडितेच्या भावानं खरं कारणच सांगितलं, वाचा इनसाईड स्टोरी...

SCROLL FOR NEXT