Indian U19 Team Sachin Dhas News In Marathi 
क्रीडा

Sachin Dhas : सचिन... सचिन... वर्ल्ड सेमीफायनल मध्ये पुन्हा घुमला नारा, काय आहे बीडच्या सुपरस्टारच्या नावामागचं कारण?

Indian U19 Team Who is Sachin Dhas :

Kiran Mahanavar

Indian U19 Team Who is Sachin Dhas : अंडर-19 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताला विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य दिले. कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांच्या स्फोटक खेळीमुळे टीम इंडियाने हे लक्ष्य गाठले.

एकेवळ सामना भारत हारले असं वाटत होतं कारण 32 धावांवर भारताच्या चार विकेट्स पडल्या होत्या, त्यानंतर संघाची धुरा सचिन धस आणि कर्णधार उदय सहारनने संभाळली. सचिन धसने 96 धावांची (95 चेंडू) खेळी केली. त्याचवेळी त्याला कर्णधार उदय सहारनने 81 धावांची (124 चेंडू) साथ लाभली. अशा प्रकारे भारताने 245 धावांचे लक्ष्य 7 चेंडू राखून पूर्ण केले. यापूर्वी सचिन धसने नेपाळविरुद्धच्या सामन्यातही 117 धावांची खेळी केली होती.

आयपीएल संघ पंजाब किंग्जने सचिन दासच्या खेळीची तुलना सचिन तेंडुलकरच्या खेळीशी केली आहे. पंजाब किंग्सने सोशल मीडिया X वर सचिन तेंडुलकर आणि सचिन दासचे फोटो पोस्ट करताना लिहिले की, 'सचिन वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये नेहमीच चांगला खेळतो. हे आपण यापूर्वीही पाहिले आहे. भारतीय संघाने वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर अंडर-19 भारतीय संघाचे खूप कौतुक होत आहे.

बीडच्या सुपरस्टारच्या नावामागचं कारण?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहणाऱ्या सचिन धसचे वडील संजय धस हे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते आहे. यामुळे त्यांनी मुलाचे नाव सचिन ठेवले. वडीलांना क्रिकेट आवडत होते आणि त्यामुळे लहानपणीच ठरवले होते की सचिन क्रिकेटर बनणार. असे स्वतः सचिन धस कर्णधार उदय सहारनशी बोलताना म्हणाला. त्यांचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळने सोशल मीडिया पोस्ट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT