Prime Minister Narendra Modi lays foundation stone of international cricket stadium in Varanasi 
क्रीडा

Varanasi Cricket Stadium : 1 नंबरची जर्सी नमोची... मास्टर ब्लास्टरची उपस्थिती; मोदींनी वाराणसी स्टेडियमची केली पायाभरणी

Kiran Mahanavar

Varanasi International Cricket Stadium : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही उपस्थित होते.

पीएम मोदी म्हणाले की, येथे भव्य स्टेडियम बांधल्यास लोकांची संख्या वाढेल, ज्याचा फायदा काशीला होईल. याशिवाय दुकानदार, टॅक्सी चालक यांनाही फायदा होणार आहे. देशाच्या विचारसरणीत खूप बदल झाला आहे, त्याचाच परिणाम म्हणून आज भारत क्रीडा क्षेत्रात अधिक यशस्वी होत आहे.

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह उपस्थित आहेत. याशिवाय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि कपिल देवही उपस्थित आहेत.

खरे तर हे क्रिकेट स्टेडियम एका खास पद्धतीने बनवले जात आहे. स्टेडियमचा आकार अर्धचंद्राच्या आकाराचा असेल, ज्यामध्ये फ्लड लाइट त्रिशूळाच्या आकारात असतील. इमारतीमध्ये बेलपत्राचे डिझाईन दिसेल, तर डिझाईनमध्ये डमरूचा आकारही असेल. गंगा घाटाच्या पायऱ्यांप्रमाणे प्रेक्षक गॅलरी असेल. जिथे चाहत्यांना बसून सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

हे स्टेडियम बांधण्यासाठी किती खर्च येईल?

या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी अंदाजे 451 कोटी रुपये खर्च येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने भूसंपादनासाठी 121 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर बीसीसीआय स्टेडियम बांधण्यासाठी 330 कोटी रुपये खर्च करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी; आता रकमेची मर्यादा नव्हे सातबाराच होणार कोरा! राज्यातील २४.७३ लाख शेतकऱ्यांकडे ३५,४७७ कोटींची थकबाकी

सोलापूर शहर पोलिसांची कारवाई! स्वयंघोषित ‘दादा’ 8 दिवसांसाठी होणार तडीपार; महापालिका निवडणुकीपूर्वी ‘या’ गुन्हेगारांची पोलिस ठाण्यांकडून मागविली माहिती

Morning Breakfast Recipe: कुठल्याही पूर्वतयारीशिवाय १५ मिनिटांत सकाळी नाश्त्यात बनवा पेरी पेरी कबाब, सोपी आहे रेसिपी

अग्रलेख - शेजारचा आजार

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT