Saina Nehwal slams umpires for poor umpiring
Saina Nehwal slams umpires for poor umpiring  
क्रीडा

पंचांच्याच चुकीमुळे हरले; साईना नेहवालची टीका

वृत्तसंस्था

बासेल (स्वित्झर्लंड) : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने पंचांना धारेवर धरले आहे. तिच्यासह तिचा पती आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू पी. कश्‍यप यांनी पंचांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला अशी टिका केली आहे. 

साईनाला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड्‌ट हिच्याकडून संघर्षपूर्ण लढतीत 21-15, 25-27, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना जवळपास 1 तास 12 मिनिटे चालला होता. 
दुसऱ्या गेममधील दोन मॅच पॉइंट पंचानी नाकारले यावर अजून विश्‍वास बसत नाही. त्या वेळी पंचांना "लाईन अंपायर्सना त्यांचे काम करु द्यात' असे सुनावले. अचानक पंच मॅच पॉइंट कसे नाकारू शकतात याचेच मला राहून राहून आश्‍चर्य वाटते.'असे टिव्‌ट करून साईनाने पंचांना लक्ष्य केले. 

ज्या कोर्टवरील सामन्यांचे प्रक्षेपण केले जात होते, त्या कोर्टवर साईनाची लढत नसल्यामुळे त्याचे व्हिडियो व्हायरल होऊ शकले नाहीत. त्यामुळे तिला "रिव्ह्यू' देखील घेता आले नाहीत. या लढतीसाठी उपस्थित असलेला तिचा पती कश्‍यप यानेही पंचांवर टिका करताना "दोन मॅच पॉइंट नाकारून पंचांनी साईनाचा विजय हिरावून घेतला.' असे ट्‌विट केले आहे. 

जागतिक अजिंक्‍यपदसारख्या स्पर्धेत प्रत्येक कोर्टवर "रिव्ह्यू'ची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही हे अविश्‍वसनीय आहे. 
-साईना नेहवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT