Sakshi Suryawanshi Wins Gold Medal in Pistol Shooting Competition esakal
क्रीडा

International Competition : नेमबाज साक्षी सूर्यवंशीची 'बुलेट' सुसाट! ऑलिंपिकचे ध्येय, दिल्लीत 'खेलो इंडिया'कडून करणार सराव

या यशाने सांगली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकले आणि वाळवा तालुक्याच्या लौकिकातही भर पडली.

धर्मवीर पाटील

५० मीटर पिस्तूल शूटिंग स्पर्धा प्रकारात साक्षीने टियाना (हरयाना) आणि करणदीप कौर (पंजाब) या सहकाऱ्यांच्या सोबतीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

इस्लामपूर : बाकू (अझरबैझान) मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत (World Championship Competition) ५० मीटर पिस्तूल शूटिंग स्पर्धा (Pistol Shooting Competition) प्रकारात सुवर्णपदक पटकावलेल्या साखराळे (ता. वाळवा) येथील साक्षी सूर्यवंशीची ‘बुलेट’ सध्या सुसाट आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी (International Competition) तिची तयारी सुरू असून, आता त्या दिशेने तिचा प्रवास सुरू आहे.

५० मीटर पिस्तूल शूटिंग स्पर्धा प्रकारात साक्षीने टियाना (हरयाना) आणि करणदीप कौर (पंजाब) या सहकाऱ्यांच्या सोबतीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. या यशाने सांगली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकले आणि वाळवा तालुक्याच्या लौकिकातही भर पडली. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या मेहनती साक्षीने (Sakshi Suryavanshi) परिस्थितीवर मात करत आणि अनेकांच्या मदतीने आज नेत्रदीपक यश कमावले आहे, पण त्यावर ती समाधानी नाही.

तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशासाठी अव्वल कामगिरी करायची आहे. त्यासाठी तिची तयारी सुरू आहे. अझरबैझान देशाची राजधानी बाकू येथे ५१ देशांच्या सहभागातून झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिच्या यशानंतर तिला चांगल्या संधी चालून येत आहेत. साक्षी अत्यंत जिद्दी आणि मेहनती आहे. इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बीसीए विभागाची ती विद्यार्थिनी आहे. सध्या कोल्हापुरात तिचा रोज आठ-दहा तासांचा सलग सराव सुरू आहे. तिच्या यशामुळे तिला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली, चर्चगेट मुंबई येथील मुख्य कार्यालयात ती रुजू झाली आहे, परंतु त्याही पुढच्या पदांसाठी ती पात्र आहे.

केवळ ती पदवीधर नसल्याने त्या पदांपासून ती दूर आहे. अन्यथा शासकीय कोट्यातून मिळणाऱ्या अनेक मोठ्या पदांच्या संधी तिला चालून येत आहेत. सध्या स्पर्धेच्या तयारीसाठी तिला सुटी मिळाली असून, कोल्हापूर येथे ती सध्या प्रशिक्षक जितेंद्र विभूते यांच्याकडे ती प्रशिक्षण घेत आहे. मुंबईत रेल्वे प्रशिक्षक विश्वजित शिंदे यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. दिल्ली येथील ‘खेलो इंडिया’कडे तिचा प्रस्ताव गेला आणि तिथेही तिची निवड झाली. त्याठिकाणी तिच्यावर दोन वर्षे आठ लाख रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. दिल्ली येथे लवकरच तिचे निवासी प्रशिक्षण सुरू होईल. दरम्यान, पुढच्या महिन्यात ३ जूनपासून भोपाळ येथे कुमार सुरेंद्र सिंह मेमोरियल स्पर्धेत ती सहभागी होणार आहे.

केंद्र शासनाचे ९ लाखांचे बक्षिस!

५० मीटर पिस्तूल शूटिंग स्पर्धा प्रकारात साक्षीने टियाना (हरयाना) आणि करणदीप कौर (पंजाब) या सहकाऱ्यांच्या सोबतीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यावेळी दोघी खेळाडूंच्या १० लाख रुपयांच्या खर्चाची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली होती, परंतु तुलनेने साक्षीला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिच्या कुटुंबाला कर्ज काढावे लागले होते, शिवाय खासगी मदतही मिळवावी लागली होती, स्पर्धेला जातानाच साक्षीला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले होते. या यशानंतर केंद्र शासनाने तिघींत एकूण २७ लाखांपैकी साक्षीला ९ लाख रुपयांची मदत दिली आणि तिला आधार मिळाला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे नाव उज्ज्वल करायचे ध्येय आहे. १० मीटर, २५ मीटर आणि ५० मीटर पिस्तूल शूटिंगचा नित्यनेमाने सराव सुरू आहे. आजपर्यंतच्या माझ्या प्रवासात अनेकांनी साथ दिली, त्या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे.

-साक्षी अनिल सूर्यवंशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT