Sam Curran Player Of The Tournament T20 World Cup 2022 esakal
क्रीडा

Sam Curran : सॅम करनने इतिहास रचला! यापूर्वी एकाही टी 20 वर्ल्डकपमध्ये असं कधी झालं नव्हतं

अनिरुद्ध संकपाळ

Sam Curran Player Of The Tournament T20 World Cup 2022 : मेलबर्नमध्ये रंगलेल्या टी 20 वर्ल्डकप 2022 अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला. इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 137 धावात रोखले. त्यानंतर हे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 षटकात पार केले. इंग्लंडच्या या विजयाचे तसे अनेक वाटेकरी आहेत. मात्र अवघ्या 24 वर्षाच्या सॅम करनने फायनलमध्ये ज्या प्रकारे दमदार खेळ केला ते पाहता सॅम करनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. याचबरोबर सॅम करनाला मालिकावीराचा (Player Of The Tournament) देखील पुरस्कार देण्यात आला. इथेच 24 वर्षाच्या सॅम करनने इतिहास रचला.

सॅम करनने फायनल सामन्यात पाकिस्तानचे तीन फलंदाज बाद केले. यात सर्वात महत्वाची विकेट ठरली ती सलामीवीर मोहम्मद रिझवानची. त्याने रिझवानला 15 धावांवर बाद करत पाकिस्तानला मोठा धक्का. त्यानंतर त्याने 28 चेंडूत 38 धावा करणाऱ्या मसूदला आणि मोहम्मद नवाझला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे करनने अवघ्या 12 धावात या तीन शिकार केल्या. यामुळेच पाकिस्तानला 137 धावात रोखणे इंग्लंडला शक्य झाले.

सॅम करनने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये एकूण 148 धावा देत 13 विकेट्स घेतल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत वानिंदू हसरंगानंतर (15 विकेट्स) दुसऱ्या स्थानावर आहे. यामुळेच त्याला सामनावीराबरोबरच मालिकावीराच्या पुरस्काराने नावाजण्यात आले.

विशेष म्हणजे आतापर्यंतच्या 8 टी 20 वर्ल्डकपमध्ये मालिकावीराचा पुरस्कार हा बॅटिंग ऑलराऊंडर किंवा फलंदाजाला मिळाला आहे. सॅम करन हा टी 20 वर्ल्डकप इतिहासातील पहिला गोलंदाज आहे ज्याने मालिकावीराचा (Player Of The Tournament) पुरस्कार पटकावला आहे.

टी 20 वर्ल्डकप मालिकावीर

शाहिद आफ्रिदी 2007

तिलकरत्ने दिलशान 2009

केव्हिन पिटरसन 2010

शेन वॉटसन 2012

विराट कोहली 2014

विराट कोहली 2016

डेव्हिड वॉर्नर 2021

सॅम करन 2022

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT