Pravin Jadhav google
क्रीडा

हताश झालो, डगमगलो नाही; ऑलिंपिकला देशाचा झेंडा फडकविणारच!

सिद्धार्थ लाटकर

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सरडे हे प्रवीण जाधवचं गाव. अतिशय कष्ट करत त्यानं स्वत:ला ऑलिंपिकला पात्र बनवलं. नेदरलँडमध्ये पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने सांघिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली. तरुणदीप राय, अतानू दास या मातब्बर खेळाडूंसोबत प्रवीण जाधवनेही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध केलं. आता त्याला ऑलिंपिकला वेध लागलेले आहेत.

सातारा : देशात कोरोना (covid19 pandmeic) आल्यानंतर काहीसा मी चलबिचल झालो. स्पर्धेबाबतची शंका मनात आली. त्यात लॉकडाऊन (lockdown) झाल्यानंतर ऑलिंपिकलचे (tokyo olympic) वेळापत्रक पुढं गेले. हताश झालो परंतु डगमगलो नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या आहे तशाच स्वीकारणं भाग आहे. निश्चय करुन सराव सुरुच ठेवला. आजही मी कुटुंबापासून दूर राहून केवळ ऑलिंपिकची तयारी करीत आहे. पॅरीस येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेसाठी (world archery competition) रवाना हाेण्यापुर्वी सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण रमेश जाधव (archer pravin jadhav) ई-सकाळशी भरभरुन बाेलत हाेता. आहे ती परिस्थिती स्वीकारून लढायचं एवढंच म्हणणारा प्रवीणला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे पुन्हा एकदा वेध लागले आहेत. त्यासाठी खराडीत त्याचा कसून सराव सुरु आहे. (satara-boy-pravin-jadhav-targets-world-archery-competition-paris-tokyo-olympics-glory)

देशाला कुस्तीत पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव (kshabha jadhav), धावपटू ललिता बाबर (lalita babar) यांच्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्याचा ऑलिंपिकमध्ये झेंडा रोवणारे प्रवीण रमेश जाधव (pravin jadhav) हे तिसरे ऑलिंपिकपटू ठरणार आहेत. नेदरलॅंड येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत प्रवीण जाधव याने यापुर्वीच भारतीय तिरंदाज संघातील सहकारी अतानू दास, तरुणदीप राय यांच्यासह उत्तम कामगिरी करून टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमधील आपले स्थान निश्‍चित केले हाेते.

प्रवीणचा जन्म सरडे (ता. फलटण) येथील छोट्याशा गावात झाला. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अंत्यत बेताची आहे. राहायला नीटसे घर नाही. उदरनिर्वाहासाठी आजही त्याचे कुटुंबीय मोलमजुरी करतात. या परिस्थितीत प्रवीणने तिरंदाजी खेळ प्रकारात प्रावीण्य मिळवून जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर राज्य शासनाने सन २०१७-१८ चे शिवछत्रपती पुरस्काराने त्याला गौरवले आहे. सरडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवीणने शिक्षण घेतले. विकास भुजबळ गुरुजींनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने क्रीडा प्रबोधिनीतून यश मिळवले. अमरावती येथील शिक्षण संकुलात त्याने बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले.

कुटुंबियासमवेत प्रवीण जाधव

यादरम्यान त्याने तिरंदाजीत प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चमक दाखविली. सहा ते सात वर्षे त्याने स्वतःला तिरंदाजीत सिद्ध केले. तिरंदाजीमधील कौशल्याच्या जोरावर त्याने सैन्यदलात हवालदार पदावर नेमणूक मिळवली. सध्या तो आर्मी सेंटरमध्ये टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे प्रशिक्षण घेत आहे. या स्पर्धेत प्रवीण भारतीय संघाचे रिकव्हरमध्ये सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात प्रतिनिधित्व करणार आहे.

प्रवीणची कामगिरी...

तिरंदाजीत लाकडाच्या धनुष्याद्वारे वर्षभराच्या सरावानंतर पहिल्याच राष्ट्रीय शालेय रिकव्हर्समध्ये चार सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर कसून सराव करून एकेक स्पर्धेत आपली छाप उमटवली. तिरंदाजीत वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, तैपेई आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक कास्यपदक प्राप्त केले. याबरोबरच आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक विद्यापीठस्तरीय स्पर्धा, जागतिक तिरंदाजी स्पर्धांत उज्ज्वल कामगिरी केली आहे.

सध्याच्या या कठीण काळात मानसिक स्वास्थ्य म्हणा अथवा moral support म्हणा आमच्या मॅडम मुग्धा बावरे यांनी आम्हांला दिला. त्यांनी आम्हांला एनकरेज केले. परिणामी आम्ही मनावरील मरगळ झटकली. हे आयुष्य आहे आणि ते असंच अनपेक्षितपणो कलाटणी मारू शकतं याची तयारी आपण ठेवायलाच पाहिजे याचा निर्धार केला असे प्रवीणने सांगितले.

ताे म्हणाला जागतिक तिरंदाजी स्पर्धा पॅरीस येथे 21 ते 28 जून याकाळात हाेणार आहे. त्याची उत्तम तयारी झालेली आहे. या स्पर्धेतही नक्कीच यश मिळेल. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे तयारी देखील चांगल्या पद्धतीने करीत आहे. या स्पर्धेत पहिल्याच टप्प्यात आमचा इव्हेंट (आर्चरी) आहे. त्यात यश मिळविण्यासाठी अताेनात कष्ट केले आहेत असेही त्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT