साथीयनची विश्वकरंडक टेबल टेनिस स्पर्धेत आगेकूच
साथीयनची विश्वकरंडक टेबल टेनिस स्पर्धेत आगेकूच 
क्रीडा

विश्वकरंडक टेटेमध्ये साथीयन मुख्य स्पर्धेत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जी. साथीयनने विश्वकरंडक टेबल टेनिस स्पर्धेत त्याच्यापेक्षा दोन सरस खेळाडूंना पराजित करीत मुख्य फेरीत प्रवेश केला. आशियाई पात्रता स्पर्धेत सहावा आल्यामुळे साथीयन या स्पर्धेस पात्र ठरला आहे.

साथीयनने चेंगदू येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या "ड' गटात सुरुवातीस जागतिक क्रमवारीत 23 वा असलेल्या सायमन गौझी याला 0-2 पिछाडीनंतर हरवले. साथीयनने ही लढत 4-3 (11-13, 9-11, 11-8, 14-12, 7-11, 11-5, 11-8) अशी जिंकली. जागतिक क्रमवारीत तिसावा असलेल्या साथीयनने त्यानंतर जोनाथन ग्रोथला 4-2 (11-3, 12-10, 7-11, 16-14, 8-11, 11-8) पराजित केले. ग्रोथ जागतिक क्रमवारीत 24 वा आहे.

साथीयनचे आव्हान आता अधिकच अवघड असेल. त्याची लढत काही महिन्यांपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या टिमो बॉल याच्याविरुद्ध आहे. बॉल सध्या जागतिक क्रमवारीत आठवा आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या या टप्प्यास शनिवारी सुरुवात होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT