Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Loksabha Election: ठाकरे गटातील हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

डोंबिवली- कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला युवा नेते आदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरच डोंबिवली ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहेत डोंबिवली शहर प्रमुखांसह महिला संघटक, युवती सेना, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाकरे गटातील नाराजी उघड उघड समोर दिसून येतं आहॆ.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण

लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट हे शिवसेनेचे दोन गट आमने सामने येणार आहेत. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी आव्हान उभे केले आहे. दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांचा डोंबिवली दौरा आटोपतो न आटोपतो तोच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला हा धक्का दिला आहे. ठाकरे गटातील हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.जसजशा निवडणुक जवळ येऊ लागल्या तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहॆ.

कल्याण लोकसभा हा शिवसेना बालेकिल्ला असून शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर निवडणुकीसाठी उभे आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे स्वतः तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे असून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर त्याच्या समोर निवडणूक लढवत आहे.

त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागेल.यातच अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ठाकरे गटाचे पदाधिकारी यांचा प्रवेश ठाण्यात होणार आहॆ.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात करणार प्रवेश

उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुख, महिला संघटक, युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात करणार प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहॆ.त्यामुळे वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज पदाधिकारी यांची धुसफूस पुढे आली आहेत.

पक्ष प्रवेश करणाऱ्या या नावाची चर्चा

विवेक खामकर -शहरप्रमुख

कवीता गावंड - महिला जिल्हासंघटक

लीना शिर्के - युवती सेना जिल्हाधिकारी

किरण मोंडकर - उपशहर संघटक

राधिका गुप्ते - कल्याण पूर्व विधानसभा संघटक

राजेंद्र नांदुस्कर -उपशहर संघटक

श्याम चौगुले -विभाग प्रमुख

सुधीर पवार -विभाग प्रमुख

शिवराम हळदणकर -विभाग प्रमुख

नरेंद्र खाडे -उपविभाग प्रमुख

सतीश कुलकर्णी -उपविभाग प्रमुख

प्रशांत शिंदे -उपविभाग प्रमुख

प्रसाद चव्हाण -शाखाप्रमुख

विष्णू पवार -शाखाप्रमुख

मयूर जाधव -शाखाप्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com