Satwiksairaj Rankireddy-Chirag Shetty Olympics match cancelled  sakal
क्रीडा

तिसऱ्या दिवसाची मोठी अपडेट! Paris Olympics मध्ये सात्विक साईराज व चिराग शेट्टीचा सामना रद्द; मोठे कारण आले समोर

भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिने रविवारी फ्रान्समधील शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्य साधून ऐतिहासिक यश संपादन केले.

Kiran Mahanavar

Paris 2024 Olympics : भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिने रविवारी फ्रान्समधील शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्य साधून ऐतिहासिक यश संपादन केले. पिस्तूल क्वीन मनू हिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदकावर मोहर उमटवत भारताचे पॅरिस ऑलिंपिकमधील पदकाचे खाते अगदी रुबाबात उघडले.

दरम्यान, आज तिसरा दिवस सुरू होण्याआधी पुरुषांच्या बॅडमिंटनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.  सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा दुपारी होणार सामना रद्द करण्यात आला आहे.

सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल यांच्याविरुद्धचा पुरुष दुहेरी गटातील सामना रद्द करण्यात आला आहे. कारण दुखापतीमुळे जर्मन संघाने या सामन्यातून माघार घेतली आहे.

पहिल्या सामना जिंकल्यानंतर सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला आणखी दोन सामने खेळायचे होते, मात्र दुसरा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय जोडी आता एकच सामना खेळणार आहे.

पदकाच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी सात्विकसाईराज आणि चिराग यांना शेवटच्या सामन्यात जिंकून पराभवाची भरपाई करावी लागेल. सात्विकसाईराज आणि चिराग ही भारतीय जोडी त्यांचा पुढील आणि शेवटचा सामना मंगळवार, 30 जुलै रोजी इंडोनेशियाच्या अल्फियान फजर आणि अर्दियांतो मुहम्मद रियान यांच्याशी खेळेल.

हॉकीमध्ये हरमनप्रीत सिंग आणि त्याचा संघ अर्जेंटिनाशी भिडणार आहे. भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला होता. पण भारताला उपांत्यपूर्व फेरी गाठायची असेल तर हा सामना जिंकावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT