IPL news  
क्रीडा

IPL : सौदीचा फुटबॉलनंतर आता आयपीएलवर डोळा; इंग्लिश प्रीमियर लीग पेक्षाही मोठं गणित?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- एका रिपोर्टनुसार सौदी अरेबिया इंडियन प्रिमियर लीगमध्ये भागभांडवल खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. क्राऊन पिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सल्लागाराने आयपीएलमधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी चर्चा सुरु केली आहे. विशेष म्हणजे ३० अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करण्यासाठी सौदी अरेबिया तयार आहे. (Saudi Arabia is reportedly interested in buying a stake in the Indian Premier League IPL Crown Prince Mohammed bin Salman)

ब्लुमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, सौदी अरेबियाने ही प्रक्रिया पार पाडल्यास आयपीएममधील मोठे हिस्सेदारी त्यांच्याकडे येणार आहे. दाव्यानुसार, जी-२० परिषदेसाठी सौदी क्राऊन प्रिन्स सप्टेंबरमध्ये भारतात आले होते. यावेळी याविषयावर त्यांनी संबंधित व्यक्तींशी चर्चा केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारत सरकार आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड Board of Control for Cricket in India (BCCI) पुढील वर्षी निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेऊ शकतात. सौदी अरेबियाने आयपीएलचा विस्तार हा इतर देशात करण्यासाठी 5 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

बीसीसीआयकडून याबाबत मंजुरी मिळाल्यास सौदी अरेबिया मोठी गुंतवणूत आयपीएलमध्ये करु शकतो. असे असले तरी दोन्ही पक्षांकडून याबाबत उघडपणे काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आयपीएलला सौदीची अरामको आणि सौदी टुरिझम स्पॉन्सर करते. मागील वर्षी आयपीएलचे प्रक्षेपण करण्यासाठी ६.२ अब्ज डॉलरची बोली लावण्यात आली होती. ही इंग्लिश प्रीमयर लीग आणि युएस नॅशनल फुटबॉल लीगपेक्षाही जास्त आहे. यावरुन आयपीएलची प्रसिद्ध समजून येते.

सौदीची फुटबॉलमध्ये मोठी गुंतवणूक

सौदी अरेबियाने फुटबॉल जगतात देखील मोठी गुंतवणूक केली आहे. अनेक फुटबॉल लीगमध्ये त्यांनी गुंतवणूक केली असून फुटबॉल जगतातील जवळपास सर्व स्टार हे आपल्या क्लबकडून कसे खेळतील याची तजवीत करून ठेवली आहे. सौदीने 2034 चा वर्ल्डकप आयोजन करण्यासाठी आपली प्रबळ दावेदारी सादर केली.

सौदीने पीआयएफ फंडने फुटबॉलसह जवळपास 21 खेळांमध्ये 312 स्पॉन्सरशिप डील केल्या आहेत. त्यातील 83 डील या फुटबॉलच्या आणि मोटर स्पोर्ट्सच्या 34, गोल्फमध्ये 33 डीलचा समावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT