क्रीडा

भारताच्या अंडर १९ संघाच्या माजी कर्णधाराचे निधन

सकाळ डिजिटल टीम

भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि २०१९-२० च्या हंगामात रणजी चषक जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि २०१९-२० च्या हंगामात रणजी चषक जिंकून देणाऱ्या संघातील खेळाडूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या २९ व्या वर्षी अवि बरोट याने अखेरचा श्वास घेतला. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अवि बरोटचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. अवि बरोटच्या निधनाने क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. बीसीसीआय़चे सचिव जय शहा यांच्यासह इतर दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

सौराष्ट्र असोसिएशनने म्हटलं की, हरियाणा आणि गुजरातचेसुद्धा प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सौराष्ट्र असोसिएशनमधील प्रत्येकाला अवि बरोटच्या निधनाने धक्का बसला असून त्याचं असं अकाली जाणं दु:खद असल्याचं म्हटलं आहे.

फलंदाजीसह ऑफ ब्रेक गोलंदाजीतही अवि बरोटने चमक दाखवली होती. त्यानं ३८ प्रथम श्रेणी सामने तर ३८ लिस्ट ए सामने खेळले होते. याशिवाय २० घरेलू टी २० सामनेही त्यानं खेळले होते. अवि बरोट यष्टीरक्षक फलंदाज होता. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५४७ धावा केल्या होत्या. तर टी २० मध्ये ७१७ धावा केल्या होत्या.

रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य होत्या. बंगालला पराभूत करून सौराष्ट्रने रणजी चषकावर नाव कोरलं होतं. त्याआधी २०११ मध्ये भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा कर्णधारसुद्धा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT