Schoolympics 2023 Basketball  
क्रीडा

Schoolympics 2023 : बास्केटबॉल स्पर्धेत सरदार दस्तूर, सेंट जोसेफ प्रशाला अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : सकाळ स्कूलिंपिक्स बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटातून सरदार दस्तूर नोशेरवान स्कूल आणि सेंट जोसेफ प्रशालेने अंतिम फेरी गाठली आहे.

डेक्कन जिमखाना क्लबच्या बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत अर्णवी फुलबांधे व सई सोनवणेने (प्रत्येकी ६ गुण) केलेल्या सुरेख खेळाच्या जोरावर सरदार दस्तूर नोशेरवान स्कूलने दि कल्याणी स्कूलचा ३०-८ असा २२ गुणांनी पराभव केला. तर पाषाणच्या सेंट जोसेफ स्कूलने सेंट अ‍ॅन्स स्कूलचा ४६-३६ असा दहा गुणांनी पराभव केला. त्यात महत्त्वाचा वाटा अनुषा सोनटक्के व अमीन हेत्वीने नोंदविलेल्या प्रत्येकी दहा गुणांचा होता. पराभूत संघाच्या रेवा कुलकर्णीने सर्वाधिक २६ गुण नोंदविताना केलेली खेळी एकाकी ठरली.

मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत विद्यांचलने मिलेनियम स्कूलचा ३९-३७ असा, अमनोरा स्कूलने लॉयलाचा ४०-२७ असा, जे एन पेटिटने पवार पब्लिक स्कूलचा ४९- ४१ असा, तर सेंट व्हिन्सेंटने अभिनव विद्यालयाचा २७-२० असा पराभव केला होता.

निकाल ः मुले : उपांत्यपूर्व फेरी : १) विद्यांचल स्कूल - ३९ (ओम दंडवते १५, शौर्य देवरे ६) वि.वि. मिलेनियम नॅशनल स्कूल - ३७ (विराज साठे १०, स्मित गुजर ७), २) अमनोरा स्कूल, हडपसर - ४० (गिनित सोनी १६, युवीत जैन ८) वि.वि. लॉयला हायस्कूल - २७ (इशान सूर्यवंशी १५, अमेय पाटील ८), ३) जे एन. पेटिट - ४९ (आदित्य पवार २४, श्रेयश पवार २०) वि.वि. पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी - ४१ (शौनक गोगटे १४, पियुष पाटील १२), ४) सेंट व्हिन्सेंट स्कूल - २७ (आर्केश गायकवाड १७) वि.वि. अभिनव विद्यालय - २० (आर्यन देवधर ७, श्रेयन माणकेश्वर ६).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT