Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेत जे. एन. पेटिट हायस्कूलने झेडपीपी स्कूलवर ७५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रेम निंबाळकरने नाबाद अर्धशतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. व्हिबग्योर हायस्कूलच्या युवराज बिश्त आणि सरदार दस्तुरच्या ऋग्वेद माहूरकर यांनी अविस्मरणीय फटकेबाजी करत आपापल्या संघांना विजय मिळवून दिले. स्पर्धेचे सामने फर्ग्युसन कॉलेज, शिवाजीनगर आणि सनराईज क्रिकेट ॲकॅडमी, सहकारनगर येथे सुरू आहेत.
संक्षिप्त धावफलक :
जे. एन. पेटिट हायस्कूल, बंडगार्डन : १० षटकांत ३ बाद ११२ (प्रेम निंबाळकर नाबाद ६३, आर्यन दहिदुळे २१, रिशान धांडोरे नाबाद ११, साईराज लोहार १-१३) ७५ धावांनी विवि झेडपीपी स्कूल सणसवाडी ः ९ बाद ३८ (धाराजी सोनटक्के ७, समीर पठाण ७, देवेंद्र चौधरी ३-१७, अथर्व पाटील १-४)
सामनावीर ः प्रेम निंबाळकर
डॉ. जी. जी. इंटरनॅशनल, पिंपरी ः १० षटकांत ४ बाद ११२ (हार्दिक धनवानी २४, आरुष बन्सल २४, मल्लिकार्जुन मगदूम २४, साहिल माने १-१२) ५३ धावांनी विवि लोकसेवा इंग्लिश स्कूल, फुलगाव ः ६ बाद ५९ (कृष्णा काळे २२, साहिल माने ८, जय पांडे ३-५, अर्णव मधे ३-८)
सामनावीर ः जय पांडे.
डॉ. जी. जी. हायस्कूल : १० षटकांत ५ बाद ९१ (वर्धन शहा ४०, मितेश दमानी १२, लोकेंद्र औटी १२, अथर्व रासकर २-२७, धैर्य तलवार १-७) १२ धावांनी विवि आचार्य श्री विजयवल्लभ स्कूल, १० षटकांत ३ बाद ७९ (अजिंक्य ताठार नाबाद ४१, धैर्य ठाकूर १६, मितेश दमानी १-११)
सामनावीर ः वर्धन शहा
व्हिबग्योर हायस्कूल, एनआयबीएम रस्ता ः १० षटकांत बिनबाद १०१ (युवराज बिश्त नाबाद ५४, विवान गिरिधर नाबाद २२) ३४ धावांनी विवि पर्ल ड्रॉप, कोंढवा खुर्द १० षटकांत ४ बाद ६७ (हमजा इनामदार २५, झिदान पानसरे ८, कविश लोकवानी १-७)
सामनावीर ः युवराज बिश्त
कै. बंडोजी खंडोजी चव्हाण हायस्कूल, धायरी ः १० षटकांत ५ बाद ६३ (आदित्य पासलकर ३०, अनुराग सातपुते नाबाद ७, प्रसाद मोरे १-७, इंद्रनील चव्हाण १-९) ९ विकेटनी पराभूत वि डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल, एरंडवणे ः ५.३ षटकांत १ बाद ६४ (तेविन कुलकर्णी २०, आदि मुथा नाबाद ३४, अनुराग सातपुते १-२३)
सामनावीर ः आदि मुथा
सरदार दस्तुर, कॅम्प ः १० षटकांत बिनबाद ९२ (ऋग्वेद माहूरकर नाबाद ६१, हिमांशू गायकवाड नाबाद २६) ३४ धावांनी विवि विद्या प्रतिष्ठान, नांदेड सिटी ः १० षटकांत ७ बाद ५८ (सोहम खुंटे नाबाद १६, आदित्य चावरे १३, ऋग्वेद माहूरकर २-१४, आयुष भूमकर १-४)
सामनावीर ः ऋग्वेद माहूरकर
सिग्नेट पब्लिक स्कूल, हडपसर विवि श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव (पुढे चाल).
शारदाबाई पवार विद्यामंदिर, बारामती विवि पोदार इंटरनॅशनल स्कूल, ताथवडे (पुढे चाल).
नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल, फुलगाव विवि ऑर्किड्स इंटरनॅशनल, ताथवडे (पुढे चाल).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.