INDw 
क्रीडा

शफालीच्या साथीला नवी हिरोईन; अखेर ऑस्ट्रेलियाला हारवून दाखवलं

ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली असली तरी 26 सामन्यानंतर अखेर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन दाखवलं आहे.

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला अखेर विजय मिळाला आहे. तीन सामन्यांची मालिका गमावल्याच्या दबावातून सावरत मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा अखेरचा वनडे सामना 2 विकेट राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली असली तरी 26 सामन्यानंतर अखेर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन दाखवलं आहे.

पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने निर्धारित 50 षटकात 9 विकेट गमावून 284 धावा केल्या होत्या. बेथ मूनी (52) आणि एश्ले गार्डनर (67) या दोघींनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतीय महिलांसमोर आव्हानात्मक धावसंख्या ठेवली होती. या धावांचा पाठलाग करताना यात्सिका भाटिया आणि शफाली वर्माने अर्धशतकी खेळी केली.

शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या दोघींनी भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 59 धावा केल्या. स्मृती मानधनाच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. तिने 22 धावा केल्या. शफाली वर्मा 91 चेंडूत 56 धावांची खेळी करुन परतली. त्यापूर्वी तिने यास्तिका भाटियाच्या साथीने तिने शतकी भागीदारी रचली.

तिची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या रिचा घोषला खातेही उघडता आले नाही. यास्तिकाच्या रुपात भारतीय संघाला चौथा धक्का बसला. मिताली राज 16, दीप्ती शर्मा 31 आणि स्नेह राणाने 30 धावांची खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. झुलन गोस्वामीने चौकार खेचत भारतीय महिला संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT