shakib al hasan-once-again-looses-cool-hit-fan-with-his-cap-during-an-promotional-event-in-bangladesh  
क्रीडा

Video : बांगलादेश कर्णधार शकिब अल हसन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! चाहत्याला केली मारहाण

पुन्हा एकदा क्रिकेटच्या या बॅड बॉयने असे काही कृत्य केले आहे की...

Kiran Mahanavar

बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शकिब अल हसनचा वादांशी सखोल संबंध आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याने अनेक वेळा लाज वाटणारी काम केली आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या या बॅड बॉयने असे कृत्य केले आहे, ज्यानंतर तो लोकांच्या निशाण्यावर आला आहे.

शाकिब अल हसनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा अष्टपैलू खेळाडू मोठ्या गर्दीत आपला संयम गमावतो आणि एका चाहत्याला सार्वजनिकरित्या मारहाण करतो.

शाकिब अल हसनने एका चाहत्याला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. शाकिब एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये गेला होता, जिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, एका व्यक्तीने शाकिबची टोपी काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे बांगलादेशी अष्टपैलू खेळाडू इतका संतापला की त्याने आधी त्याची टोपी हिसकावून घेतली आणि नंतर चाहत्याला मारले. शाकिबच्या रागाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाकिब किती संतापला आहे, हे पाहता येईल. याआधी बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूनेही असे कृत्य केले आहे.

शाकिब अल हसन सध्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत बांगलादेशचे नेतृत्व करत आहे. उभय देशांमधील 3 टी-20 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यात शाकिबने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने प्रथम शानदार गोलंदाजी करत 4 षटकात 26 धावा देत 1 बळी घेतला आणि त्यानंतर इंग्लंडच्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 24 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. त्याने 6 चौकार मारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Missing Link Accident: पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंकवर येताच होत्याचं नव्हत झालं; पुण्यातील युवा काँग्रेस नेत्याचा मृत्यू, मध्यरात्री काय घडलं?

Marathi News Live Updates : पंतप्रधानांशी महाराष्ट्राचा विकास व इतर संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली- एकनाथ शिंदे

Raju Shetty: ६० वर्षांचा वनवास संपवा! पवना धरणग्रस्त आक्रमक; राजू शेट्टींचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Mumbai Indians च्या ताफ्यात 'हे' ४ खेळाडू घेऊ शकतात हार्दिक पांड्याची जागा! CSK, KKR सोडून अन्य पर्यायाचा विचार; कोण आहेत ते?

SCROLL FOR NEXT