Shane Warne Sakal Digital
क्रीडा

Shane Warne: फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं निधन

सकाळ डिजिटल टीम

Shane Warne dies :ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. 1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणारा शेन वॉर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. 13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेलेल्या शेन वॉर्ननं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. वनडेच 194 या दिग्गजाच्या खात्यात 293 विकेट्स आहेत. ज्या क्रिकेट संघात जलदगती गोलंदाजांचा भरणा आपण आजही पाहतोय त्यात या फिरकीपटून आपला हातखंडा दाखवून दिला. त्याच्या रुपात क्रिकेट जगताने महान क्रिकेटर गमावला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन त्याला ओव्हरटेक करुनच अव्वलस्थानी पोहचला होता. वॉर्न आपल्या फिरकीसोबतच गरजेच्या वेळी उपयुक्त फलंदाजी करण्यातही माहिर होता. तो असा एकमेव खेळाडू आहे ज्याने शतकाशिवाय कसोटीमध्ये 3000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

2 जानेवारी 1992 मध्ये वॉर्नने भारतीय संघाविरुद्ध सिडनीच्या मैदानातून कसोटीमध्ये पदार्पण केले होते. 2 जानेवारी 2007 मध्ये सिडनीच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 71 धावा खर्च करून 8 विकेट्स ही त्याची कसोटीतील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. कसोटीत 37 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या वार्नने 194 वनडे सामन्यात एकदा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT