World Cup 2023 Team India Esakal
क्रीडा

World Cup 2023 Team India : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा 'हुकमी एक्का'च ठरू शकतो 'दुखरी नस'

विश्वचषक २०२३ टीम इंडिया: India's 'dominant ace' can only be the 'sore nerve' in the World Cup...

Kiran Mahanavar

World Cup 2023 Team India : टीम इंडियाने 2023 च्या वर्ल्ड कपचा आगाज एकदम आपल्या शैलीत केला आहे. त्यामुळे टीम इंडिया 12 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणत चॅम्पियन बनू शकतो असा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.

रोहित शर्माने कर्णधार म्हणून आतापर्यंत जे काही निर्णय घेतले आहेत, ते योग्य सिद्ध झाले आहेत. पण एक पैलू असा आहे ज्यावर रोहितला लवकर योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा होत्याचं नव्हतं होईल.

आतापर्यंतच्या कामगिरीवरून असे दिसून येते की, रोहितने ज्या खेळाडूंवर डाव खेळला जवळपास सर्वच खेळाडूंनी आपले काम चोख बजावले आहे. पण या 3 सामन्यांमध्ये एक कमजोरी दिसून आली, ती म्हणजे सहाव्या गोलंदाजाची भूमिका, विशेषतः शार्दुल ठाकूरचा वापर.

संघातील सध्याचा फॉर्म आणि भूमिकेनुसार जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार हे निश्चित आहे.

अशा स्थितीत अश्विन आणि शार्दुल यांच्यात कुठेतरी स्पर्धा पाहायला मिळत आहे. पण वर्ल्डकप सुरू होण्याच्या आधी रोहित म्हणाला होता की, परिस्थितीनुसार या दोघांपैकी एकची संघात निवड केली जाईल.

आतापर्यंत शार्दुलला 2 सामन्यात संधी मिळाली. पण या दोन्ही सामन्यांमध्ये शार्दुलच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि यासोबत रोहितला शार्दुलच्या गोलंदाजीवर फारसा विश्वास नसल्याचे दिसून आले. शार्दुलचा संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश केला जात आहे, परंतु दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिकला त्याच्या आधी गोलंदाजी देण्यात आली.

पण दोन्ही वेळा हार्दिक सुरुवातीपासूनच खूप महागडा ठरला, तरीही दोन्ही वेळा शार्दुलने हार्दिकपेक्षा कमी षटके टाकली. अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिकने 7 षटकांत 43 धावा देत 2 विकेट घेतल्या, तर शार्दुलने 6 षटकांत 31 धावा देत 1 विकेट घेतली.

पाकिस्तानविरुद्धही सहा गोलंदाजांमध्ये शार्दुलला सर्वात शेवटी प्राधान्य देण्यात आले. त्या सामन्यात त्याला फक्त 2 षटके दिली, ज्यात त्याने 12 धावा दिल्या. याउलट हार्दिकने 6 षटके टाकली आणि 34 धावा देत 2 विकेट घेतल्या. आणि हार्दिक सतत विकेट घेत आहे.

त्यामुळे शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्यामागचे लॉजिक समजण्याच्या बाहेर आहे. त्याच्या जागी तिसरा आघाडीचा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमीला मैदानात उतरवले जाऊ शकते, जो केवळ एक चांगला गोलंदाजच नाही तर विकेट्सही घेतो.

आता काही जण असे ही म्हणत असतील की, शार्दुल ठाकूरमुळे भारतीय फलंदाजी कुठेतरी खोल होते. जर भारतीय संघाला फलंदाजीत खोली आवश्यक असेल तर अश्विनचा समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे. टीम इंडिया सध्या सातत्याने सामने जिंकत आहे, पण उपांत्य फेरीपूर्वी या समस्येवर तोडगा काढावा लागेल, अन्यथा बाद फेरी भारताचे स्वप्न भंगल्या जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: युद्धाचा धक्का! सेन्सेक्स 2300 अंकांनी घसरला, कोणत्या सेक्टरला मोठा फटका?

Israel Iran War Update : इराण-इस्रायल युद्ध थांबणार ? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा; नेतन्याहूसोबत घेणार परस्पर निर्णय

Divakar Game Arrest Wardha POCSO Case : 78 वर्षीय नेत्याचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; राष्ट्रवादी पक्ष कारवाई करणार का?

T20 World Cup जिंकला आता रिटायरमेंट घेणार का? सूर्यकुमार यादवने सांगितला पुढचा नेमका प्लॅन काय

Viral Video: 'मला लग्नाला का नाही बोलावलं...' चिमुकलीच्या प्रश्नाला विजयने दिलं क्युट उत्तर,म्हणाला... 'तुझ्यासाठी खास मी...'

SCROLL FOR NEXT