shikhar dhawan not in indias t20 world cup plans says sunil gavaskar  
क्रीडा

Shikhar Dhawan: धवनसाठी टी-20 वर्ल्डकपचे ‘शिखर’ दूरच

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकासाठीच्या भारतीय संघात शिखर धवन नसेल - सुनील गावसकर

Kiran Mahanavar

ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर यादरम्यान होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकासाठीच्या भारतीय संघात शिखर धवन नसेल, अशी भविष्यवाणी भारताचे माजी महान फलंदाज व समालोचक सुनील गावसकर यांनी केली आहे.(shikhar dhawan not in indias t20 world cup plans says sunil gavaskar)

धवनने दोन टी-२० विश्‍वकरंडक खेळण्याचा मान मिळवला आहे. आता तिसरा टी-२० विश्‍वकरंडक खेळण्याची शक्यता धूसर असल्याचे गावसकर यांना वाटते. धवनला आयर्लंडविरुद्धच्या लढतींसाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले नाही; तर मग टी-२० विश्‍वकरंडकासाठी त्याला भारताच्या संघात कशी काय संधी दिली जाऊ शकते, असा प्रश्‍न गावसकर यांना या वेळी पडला आहे.

ऋतुराज गायकवाड, इशान किशन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलामीवीरांची भूमिका पार पाडली; मात्र गावसकर यांची सलामीवीरांसाठी या दोघांनाही पसंती नाही. गावसकर म्हणाले, के. एल. राहुल तंदुरुस्त असल्यास त्याने रोहित शर्मासोबत सलामीला यायला हवे.

आयपीएलमधील फॉर्म

धवनने आयपीएलच्या नुकत्यात पार पडलेल्या मोसमात पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. त्याने १४ सामन्यांमधून ४६० धावा फटकावल्या. मात्र भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी प्रचंड रस्सीखेच दिसून येत आहे. त्यामुळे ३६ वर्षीय धवनसाठी भारताच्या टी-२० संघात स्थान मिळवण्याचा मार्ग कठीण असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT