Shoaib Akhtar Asia Cup 2023
Shoaib Akhtar Asia Cup 2023  esakal
क्रीडा

Shoaib Akhtar : भारत मुद्दाम सामना हरणार होता... शोएब अख्तरने क्रिकेट चाहत्याला नक्की काय सुनावलं?

अनिरुद्ध संकपाळ

Shoaib Akhtar Asia Cup 2023 : आशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताने सुपर 4 मधील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी पराभव करत 2 गुणांसह आपले नेट रनरेट हे +2.690 इतके ठेवले. यामुळे लंकेविरूद्धचा विजय भारताला थेट फायनलमध्ये घेऊन गेला.

भारत आणि श्रीलंका सामन्यावेळी लंकेचा युवा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालागेने दमदार कामगिरी करत भारताचा निम्मा संघ गारद केला. त्यामुळे भारताला फक्त 213 धावाच करता आल्या. वेल्लालागेने गोलंदाजी पाठोपाठ फलंदाजीत देखील चमक दाखवली. त्याने नाबाद 42 धावा केल्या. यामुळे भारताच्या हातून सामना निसटतो की काय अशी भीती वाटत होती.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि क्रिकेट चाहत्यामध्ये भारत - श्रीलंका सामना फिक्स असल्यावरून खडाजंगी झाली. अख्तर आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की एका चाहत्याने मला भारत मुद्दाम सामना हारत आहे असा मेसेज केला. यावर अख्तरने त्या चाहत्याला खडे बोल सुनावले.

अख्तर म्हणाला, 'मला माहिती नाही की तुम्ही लोकं काय करता. मला पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी भारत मुद्दाम सामना हरणार आहे असे मेसेज आणि मीम्स आले आहेत. तुम्ही सर्वजण ठीक आहात ना? ते जीव तोडून गोलंदाजी करत आहेत. वेल्लालागे आणि असलंकाने दमदार गोलंदाजी केली.'

'तुम्ही त्या 20 वर्षाच्या मुलाला पाहिलं का? त्याने 5 विकेट्स घेतल्या आणि 42 धावा देखील केल्या. मला भारत आणि इतर देशातून फोन आलेत की भारत मुद्दाम हरणार आहे.'

अख्तर पुढे म्हणाला की, 'मला सांगा ते का हरतील? त्यांना फायनल गाठायची आहे. तुम्ही कारण नसताना मीम्स तयार करता. भारताने दमदार कमबॅक केलं. कुलदीप ज्या प्रकारे खेळला खूप भारी होतं. जसप्रीत बुमराहकडे पाहा. त्यांनी छोटी धावसंख्या डिफेंड करताना चांगली झुंज दिली.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT