Indian Team for World Cup 2023  esakal
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी भारताला मोठा धक्का, 'हा' खेळाडू जाणार बाहेर?

अनिरुद्ध संकपाळ

Indian Team for World Cup 2023 : भारतीय संघाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपची जय्यत तयारी सुरू केली आहे. वर्ल्डकपला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघ अनेक मालिका खेळणार आहे. मात्र यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या रिकव्हरी बाबत माहिती समोर आली आहे. राहुल पूर्णपणे फिट होण्याच्या मार्गावार आहे. तो लवकरच त्याचा मॅच फिटनेस सिद्ध करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर देखील एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत आहे.

यंदाचा आशिया कप हा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. हा निर्णय वर्ल्डकपसाठी सराव व्हावा म्हणून घेण्यात आला आहे. बीसीसीआय आशिया कपवर नजर ठेवून आहे. आशिया कपपूर्वी भारतीय संघातील खेळाडू फिट होऊन संघात परतण्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल सोडला तर इतर कोणत्या खेळाडूने अजून आशिया कप खेळू शकेल असा फिटनेस कमावलेला नाही.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'केएल राहुलची रिकव्हरी चांगली सुरू आहे. तो जवळपास एका महिन्यात फिट होईल. शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणे कठिण असते. तो वर्ल्डकपचा भारतासाठीचा महत्वाचा खेळाडू आहे. अय्यर दुखापतीतून संथ गतीने सावरत आहे. मात्र आम्हाला आशा आहे की तो वर्ल्डकप पर्यंत फिट होईल. मात्र अय्यरबाबत खात्रीने काही सांगता येत नाही.'

बीसीसीआय अधिकारी पुढे म्हणाले की, 'महिनाभराच्या ब्रेकमुळे चांगली मदत मिळाली आहे. मात्र दोघेही मॅच फिटनेस मिळवण्यापासून अजून दूर आहे. केएल राहुल हा पुढच्या महिन्यात सराव सामने खेळेल याची शक्यता नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून सध्या कोणतीही जोखीम घेत नाहीये.'

'त्यांची योजना ही केएल राहुलला आशिया कपपर्यंत फिट करण्याची आहे. आम्हाला वाटते की केएल राहुलने वर्ल्डकपपूर्वी काही सामने खेळावे असं वाटतं. आशिया कप यासाठी योग्य आहे. मात्र तो 100 टक्के फिट होणे गरजेचे आहे. जर झाला नाही तर आयर्लंड दौऱ्यावर त्याच्या फिटनेसची टेस्ट घेता येईल. अय्यरला अजून काही वेळ द्यावा लागणार आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT