Shubman Gill In Trouble esakal
क्रीडा

Shubman Gill In Trouble : शुभमन गिल आलाय अडचणीत, 'त्या' ट्विटमुळे होणार मोठी कारवाई?

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill In Trouble : भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल याच्या अडचणीत वाढणार असं दिसतंय. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC Final मध्ये शुभमन गिल दुसऱ्या डावात स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला होता. बाद होण्यापूर्वी तो चांगल्या लयीत दिसत होता, सकारात्मक फलंदाजी करत होता.

मात्र शुभमन गिलचा कॅमरून ग्रीनने घेतलेला हा झेल वादाच्या भोवऱ्यात अडकला. निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला होता. मात्र तिसऱ्या पंचांनी ग्रीनच्या कॅचला ग्रीन सिग्नल देत शुभमन गिलची खेळी 18 धावांवर संपवली होती. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर नंतर मोठं रणकंदन माजलं. भावनेच्या भरात शुभमन गिलनेही एक कृती केली. हीच कृती आता त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपण्यासाठी अवघी 15 मिनिटे शिल्लक असताना गिल झेलबाद झाला होता. मात्र ग्रीनने त्याचा घेतलेला झेल वादग्रस्त ठरला. यानंतर गिलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. यावेळी गिलने ग्रीन झेल पकडताना चेंडू खाली जमिनीला टेकल्याचा फोटो ट्विट केला.

आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्ट नियम क्रमांक 2.7 नुसार खेळाडू किंवा सपोर्ट् स्टाफाची सोशल मीडिया पोस्ट ही आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या उल्लघनाच्या कक्षेत येते. ज्यावेळी ग्रीनला गिलच्या ट्विटबाबत विचारले त्यावेळी तो म्हणाला की मी झेल योग्यरित्या पकडला होता. याबाबत मला खात्री होती. तिसरे पंच देखील माझ्याशी सहमत झाले.

आयपीएलमध्ये यापेक्षा जास्त कॅमेरा अँगल असतात

रोहित शर्माला देखील सामना झाल्यावर पत्रकारांनी शुभमन गिलला वादग्रस्तरित्या बाद देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला की, 'त्यांनी तीन ते चारवेळा पाहिलं आणि त्यांनी निर्णय पक्का केला. हा निर्णय खूप लवकर घेण्यात आला. ज्या पद्धतीने हा झेल घेण्यात आला ते पाहता तुम्ही 100 टक्क्यापेक्षा जास्त खात्री झाल्याशिवाय निर्णय देऊ नये. हा फायनल सामना होता. सामना एका महत्वाच्या टप्प्यावर देखील आला होता.'

रोहित पुढे म्हणाला की, 'त्यावेळी फक्त एक ते दोन कॅमेरा अँगल दाखवण्यात आले. आयपीएलमध्ये 10 अँगल्स असतात. मला कळत नाही की जागतिक स्तरावरील अशा स्पर्धामंध्ये अल्ट्रा मोशन नाही, झूम इमेज दिसली नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd Test: विंडीजच्या शतकवीराची विकेट रवींद्र जडेजासाठी विक्रमी! हरभजन सिंगला मागे टाकत भारतात केला 'हा' पराक्रम

Central Railway: मध्य रेल्वेकडून दिवाळी गिफ्ट! प्रवाशांसाठी सोडणार १६६२ उत्सव गाड्या, कधी अन् कुठे? वाचा वेळापत्रक

Banana Health Benefits: केस, त्वचा आणि मन यासाठी नैसर्गिक सौंदर्याचा खजिना म्हणजे केळ!

Pune illegal dumper traffic: डंपर चालकांना माणसं मारायचा परवाना दिलाय का? दहा महिन्यात पाच जणी चिरडल्या, हप्तेखोर प्रशासनाला कधी जाग येणार?

Army Jeep Accident: भारतीय लष्कराची जीप उलटली; एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू, तर अन्य जण जखमी, कुठे घडली घटना?

SCROLL FOR NEXT