क्रीडा

मुलांच्या तंदुरुस्तीसाठी नाशिक महसूल विभागाचे ‘चला खेळूया’

अलताफ कडकाले

सोलापूर - आजकाल नर्सरी ते आठवी या वयोगटातील बहुतांश विद्यार्थी मोबाईलमध्ये गुंतलेले आढळून येतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त क्रीडागुणांना वाव देण्याची संधी निर्माण करून देण्यासाठी; तसेच मुलांच्या तंदुरुस्तीसाठी नाशिक महसूल विभागाने ‘चला खेळूया’ हा उपक्रम सुरू केला आहे. ही संकल्पना फक्‍त नाशिक विभागापुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात राबवावी, अशी अपेक्षा क्रीडातज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे. 

आजकाल नर्सरी ते आठवी या वयोगटातील बहुतांश विद्यार्थी मोबाईलमध्ये गुंतलेले आढळून येतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त क्रीडागुणांना वाव देण्याची संधीच उपलब्ध होत नाही. त्यांना मैदानावर आणण्याची नैतिक जबाबदारी सर्वांची आहे. मुलांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी त्यांना मैदानावर आणणे गरजेचे झाले आहे. यातूनच अनेक प्रयत्न केले जात आहेत. असाच एक प्रयत्न विभागीय क्रीडा संकुल समिती नाशिक विभाग करत आहे. त्यांच्यातर्फे ‘चला खेळूया’ उपक्रम नाशिक महसूल विभागात राबविण्यात येत आहे.  नाशिक विभागातील ५४ तालुक्‍यांमध्ये नर्सरी ते आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत ‘चला खेळूया’ या उपक्रमांतर्गत स्पर्धा घेण्यात येणार आहे. शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका खेळामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या उपक्रमात शाळास्तरापासून विभागस्तरापर्यंत सर्व क्रीडाप्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. ही संकल्पना हरियाना राज्याने राबविण्यास सुरू केली आहे. 

आयुक्त महेश झगडेंची संकल्पना 
नाशिक महसूल विभागाचे आयुक्त महेश झगडे यांच्या संकल्पनेतून मुलांमध्ये खेळाची रुची निर्माण व्हावी यासाठी ‘चला खेळूया’ हा उपक्रम सुरू केला आहे. खेळामधून जय-पराजय पचवण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल आणि याचा त्यांच्या जीवनात उपयोग होईल. चला खेळूया उपक्रमामध्ये एकूण २९ विविध प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. नर्सरीच्या मुलांचा यात समावेश असल्यामुळे त्यांना खेळता येतील अशा खेळांचा यात समावेश करण्यात आला आहे. 

प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ‘चला खेळूया’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यात सामावून घेण्याचा प्रयत्नही केला जात असून, पुढील वर्षीही हा उपक्रम राबविणार आहोत. आता ‘चला खेळूया’ कायमस्वरूपी राबविण्याचा संकल्प केला आहे. 
- महेश झगडे, आयुक्‍त, नाशिक महसूल विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

NEET 2026 Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी पॅटर्नचे प्रा.शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात, अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात

IPL 2026: पंजाबच्या सलग ६ व्या पराभवानंतर प्रीती झिंटाची स्टेडियममध्येच गंभीर चर्चा; रिकी पाँटिंगचाही चेहरा उतरला

Ahilyanagar Murder Case: अहिल्यानगरमध्ये पुतण्याचा खून करून फरार आरोपीला २४ तासांत अटक; १० लाखांची रोकड जप्त..

Ramdas Athawale: मंत्री आठवलेंकडून पुन्हा शिर्डीतून लढण्याचे संकेत; कार्यकर्त्यांसोबत संवादानंतर व्यक्त केली भावना, 'जनतेचे प्रेम फेडायचे आहे'

SCROLL FOR NEXT