तैवान ओपन बॅडमिंटन
तैवान - भारताच्या माजी विजेत्या सौरभ वर्माला गुरुवारी तैवान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील चोऊ तिएन चेन याच्याकडून पराभव पत्करावा लागला. सौरभच्या पराभवाने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
गेल्या महिन्यात हैदराबाद ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या सौरभला आज चोऊचा सामनाच करता आला नाही. स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेल्या चोऊने त्याचा 21-12, 21-10 असा अवघ्या 30 मिनिटांत पराभव केला. सौरभने 2016 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
सौरभने यापूर्वी चोऊविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्य होत्या. पण, या वेळी चोऊ अधिक सरस ठरला. चोऊन 5-0 अशी सुरवात करताना गेमच्या मध्यात 11-5 अशी मोठी आघाडी घेतली होती. सौरभने नंतर लढतीत परतण्याचा प्रयत्न केला. अधिक रॅलीज खेळण्यावर त्याचा भर होता. पण, चोऊने त्याला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या गेमला सौरभने 3-1 अशी आघाडी घेतली. पण, चोऊने भलताच वेगवान आणि आक्रमक खेळ करताना लढतीचे चित्र बदलले. डावाच्या मध्यापर्यंत सौरभला नंतर केवळ एकच गुण मिळवता आला, तर चोऊने 10 गुण मिळवत 11-4 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सौरभला त्याला गाठणे जमलेच नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.