Sourav Ganguly esakal
क्रीडा

Sourav Ganguly : वनडे वर्ल्डकप हरलो तरी... दुसऱ्या कसोटीतील कामगिरीनंतर दादाची मोठी भविष्यवाणी?

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचं कंबरडंच मोडलं. पहिल्याच सत्रात 55 धावात यजमानांना गुंडाळत आपण कोणत्याही संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर मानहानीकारक पराभव देऊ शकतो याची झलक दाखवून दिली.

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 3 बाद 62 धावा झाल्या आहेत. भारताकडे अजून 36 धावांची आघाडी असून उद्या दुसऱ्या दिवशी भारताला सामना जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.

भारतीय संघाचा हा खेळ पाहून सौरव गांगुलीने संघाच्या भविष्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. हे विधान त्यानं छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या बैठकीदरम्यान केलं.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी रायपूरमध्ये सौरव गांगुलीला भेटण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी सौरव गांगुलीने पत्रकारांशी देखील संवाद साधला.

गांगुलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचा दाखला दिला. तो म्हणाला की, 'मी म्हणतोय की आपण चांगलं खेळून देखील वनडे वर्ल्डकप जिंकू शकलो नाही. मात्र भविष्यात आपण वर्ल्डकप नक्की जिंकणार.'

'संघात खूप क्षमता आणि गुणवत्ता आहे. संघाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 55 धावात गुंडाळले. जर त्यांनी फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली तर आपण कसोटी आरामात जिंकतोय. आपण दक्षिण आफ्रिकेविरूद्धची वनडे मालिका देखील जिंकली आहे.'

सौरव गांगुली मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर देखील बोलला, तो म्हणाला, 'मला मुख्यमंत्री विष्णू देव साई यांना भेटून खूप आनंद झाला. मी त्यांना पहिल्यांदाच भेटतोय. मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो त्यावेळी भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध रायपूरमध्ये खेळला होता.'

हे नवीन स्टेडियम आहे. तसेच रणजी ट्रॉफीमध्ये देखील छत्तीसगड नवा संघ आहे. येथील सोयी सुविधा उत्तम आहेत. मी मुख्यमंत्र्यांना राज्यात क्रिकेटचा प्रसार करण्याची विनंती केली आहे. मी त्यांना पहिल्यांदाच भेटतोय. ते मला आमंत्रित करतील असं वाटलं नव्हत.'

गांगुलीला टी 20 वर्ल्डकपसाठी संघ निवडबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्याने सांगितले की, 'टी 20 वर्ल्डकपसाठी अजून खूप वेळ आहे. भारताकडे खूप चांगले चांगले खेळाडू आहेत. आशा आहे की सर्वोत्तम संघ निवडला जाईल आणि आपण स्पर्धेत चांगली कामगिरी करू अशी आशा आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT