Sourav Ganguly esakal
क्रीडा

Sourav Ganguly : विराटच्या समर्थनात 'दादा' मैदानात... शोएब अख्तरला दिलं सडेतोड उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानाला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

शोएब अख्तर म्हणाला होता की विराट कोहलीने (Virat Kohli) वर्ल्डकपनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. त्याने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करावा. (Shoaib Akhtar)

शोएब अख्तरने बॅकस्टेज विथ बोरिया या कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, 'मला असं वाटतं की विराट कोहलीने वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेट खेळू नये. जर तुम्ही टी20 मध्ये देखील पाहिलं तर त्याला जास्त प्रयत्न करावे लागत आहेत. माला वाटते की त्याने अजून किमान सहा वर्षे तरी क्रिकेट खेळावे आणि भारताच्या सचिन तेंडुलकरचे 100 शतकांचे रेकॉर्ड मोडावे.

विराट कोहलीकडे सचिनचे रेकॉर्ड मोडण्याची क्षमता आहे. त्याने वर्ल्डकपनंतर कसोटी क्रिकेटकडे जास्त फोकस करायला हवे.'

दरम्यान, शोएबच्या या वक्तव्याचा सौरव गांगुलीने चांगलाच समाचार घेतला. त्याने शोएबच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. तो म्हणाला, 'का? विराट कोहली त्याला हवं तो क्रिकेट फॉरमॅटम खेळू शकतो. कारण तो त्यामध्ये कामगिरी करतोय.'

सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला एक सल्ला देखील दिला. सौरव गांगुली म्हणाला की, 'तुम्ही तुमचे सर्वोत्तम क्रिकेटपटू निवडा, मग तो डावखुरा असो वा उजव्या हाताने खेळणारा असो. भारताकडे काही दर्जेदार डावखुरे फलंदाज आहेत. ते संघात स्थान मिळवतील.

यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा आणि इशान किशन हे फलंदाज आहेत. त्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या हा एक जबरदस्त संघ आहे. भारत असा देश आहे की तिझे प्रत्येक सामन्यानंतर मुल्यमापण होतं. ज्यावेळी ते जिंकतात त्यावेळी ते चांगला संघ असतात. मात्र हरतात त्यावेळी तोच संघ वाईट होतो. तुम्हाला आता याची सवय झाली पाहिजे. आता हा खेळाचाच एक भाग आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT