Sourav Ganguly Plot Illegally Occupy esakal
क्रीडा

Sourav Ganguly : दादाच्या जमिनीवर कब्जा; फोनवरून शिवीगाळ, महिला पीएशी देखील गैरवर्तन

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly Plot Illegally Occupy : बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जमिनीवर अवैधरित्या कब्जा केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार गांगुलीची खासगी पीए तान्या भट्टाचार्य यांनी केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की सुप्रियो भौमिक नावाच्या एका व्यक्तीने महेशतला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गांगुली क्रिकेट अकॅडमीच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस तक्रारीमध्ये भट्टाचार्य यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी विरोध केल्यानंतर भौमिक आणि त्याच्या काही साथीदारांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. भट्टाचार्य यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की आरोपीने त्यांच्याशी फोनवरून देखील गैरवर्तन केले.

पोलिसांनी आरोपीला महेशतला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी सुरू केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने असं कृत्य केले नसल्याचे सांगितले की मी अनधिकृत गोष्टींचा विरोध केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला या प्रकरणात फसवले आहे.

सौरव गांगुलीच्या जमिनीवर अवैधरित्या कब्जा करण्याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक निरूपम घोष यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आमच्याकडे तक्रार दाखल झाली आहे. आरोपीला पोलीस ठाण्यात बोलवले आहे. आम्ही चौकशी करून याबाबत पावले उचलू.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT