Sourav Ganguly Trolled After Praising England Batsmen Joe Root esakal
क्रीडा

इंग्लंडच्या जो रूटची स्तुती करून 'दादा' चांगलाच फसला; ट्विटरवर झाला ट्रोल

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार शतकी खेळी केली. त्याने आपल्या खेळीच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या कसोटीच विजय मिळवून दिला. याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 10 हजार धावा देखील पूर्ण केल्या. विशेष म्हणजे जो रूट आता कसोटीत सर्वात वेगाने 10 हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला आहे. (Sourav Ganguly Trolled After Praising England Batsmen Joe Root)

जो रूटच्या या दमदार कामगिरीनंतर त्याच्यावर जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने देखील जो रूटचे अभिनंदन केले. मात्र हे अभिनंदन अनेक नेटकऱ्यांना फारसे रुचलने नाही. नेटकऱ्यांनी सौरभ गांगुलीला ट्रोल करण्यास सुरूवात केली. विराट कोहलीच्या फॅन्सनी तर सौरभ गांगुलीला चांगलेच सुनावले.

दादा ते ठीक आहे पण बीसीसीआय आणि आयसीसीला का टॅग केलं?

तुमच्या दाबावामुळे कोहली तर संपला, वेल प्लेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझ्यावर टाकलेली धाड कटकारस्थानातून: शहाजी पाटील; पालकमंत्री अन् माजी आमदाराबाबत माेठे वक्तव्य, अश्रू अनावर !

Winter Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा आलू मेथी पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 02nd December 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 December 2025

घोरण्याची समस्या

SCROLL FOR NEXT