India vs South Africa 2nd Test Marathi news sakal
क्रीडा

IND v SA: दुसऱ्या कसोटी सामन्याची बदलली वेळ! 1:30 वाजता नाही तर 'या' वेळेपासून पाहता येणार लाइव्ह ॲक्शन

India vs South Africa 2nd Test Marathi News |

Kiran Mahanavar

South Africa vs India 2nd Test : पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारताच्या नजरा दुसऱ्या सामन्यात जिंकण्याकडे असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून भारताला 2 सामन्यांची मालिका 1-1 ने संपवायची आहे.

जर तुम्ही असा विचार करत असाल की, या सामन्याचे लाईव्ह अॅक्शन भारतात दुपारी 1.30 वाजल्यापासून दाखवले जाईल, तर तसे अजिबात नाही. या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातील पहिला चेंडू 1:30 वाजता नाही तर 2 वाजता टाकला जाईल. नाणेफेक दुपारी दीड वाजता होणार आहे.

या मैदानावरील भारताच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले, तर आकडेवारी खूपच वाईट आहे. केपटाऊनमध्ये आजपर्यंत भारतीय संघाला कोणताही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. गेल्या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोठे, किती वाजता खेळवला जाईल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे बुधवारी (3 जानेवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 1.30 वाजता होईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना ऑनलाइन कुठे पाहायचा?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना तुम्ही डिस्ने + हॉटस्टार अॅप आणि सकाळच्या वेबसाइटवर ऑनलाइन https://www.esakal.com/ (लाइव्ह स्ट्रीमिंग) पाहू शकता.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यु ईश्वरन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.

दक्षिण आफ्रिका संघ : डीन एल्गर (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, टोनी डी जॉर्जी, मार्को जॅन्सन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT