Sports Bulletin Sakal
क्रीडा

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Sports News on 6th October 2024: आज म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी क्रीडा विश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेऊ.

Pranali Kodre

IND vs PAK To Rohit Sharma Video: क्रीडा विश्वात आज अनेक घडामोडी झाल्या आहेत. महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला, तर सचिन तेंडुलकरने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पोस्टही शेअर केली. तसेच रोहित शर्माला एका अभिनेत्रीने चक्क प्रपोज केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एकूणच दिवसभरातील क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या बातम्यांवर नजर टाकू.

Women's T20 World Cup 2024, IND vs PAK: भारतीय महिला संघाने महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले. असे असले तरी उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारतीय महिला संघाला Net Run Rate मध्ये सुधारणा आवश्यक आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

IND vs BAN 1T20I

IND vs BAN, T20I: बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता टी-२० मालिका आजपासून खेळणार आहे. काही प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. त्याने फलंदाजांच्या शॉट्सचे त्याच्या स्टाईलने कौतुक केले. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

Usman

Fastest Double Century: पाकिस्तानचा फलंदाज उस्मान खान याने देशाच्या लिस्ट ए क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला. त्याने एसएनजीपीएल विरुद्ध एहसाल असोसिएट्ससाठी प्रेसिडेंट चषक सामन्यात हा कारनामा केला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Rohit Sharma Viral Video: कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये टीम इंडियाच्या सहकाऱ्यांसोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रोहितने धमाल केल्याचे दिसले. याच कार्यक्रमात काम करणाऱ्या एका महिला अभिनेत्रीने रोहितला त्याची पत्नी रितिकासमोरच प्रपोजही केले. यावेळी काय झाले सविस्तर जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT