क्रीडा

रोनाल्डोमुळे रेयाल माद्रिदने विजेतेपद राखले

वृत्तसंस्था

अबुधाबी - दुसऱ्या सत्रात मिळालेल्या फ्री-किकवर क्रिस्तिआनो रोनाल्डो याने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने क्‍लब विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. अंतिम फेरीत त्यांनी ग्रेमिओ क्‍लबचा १-० असा पराभव केला. त्याचबरोबर रेयालने २०१७च्या मोसमातील पाचवे विजेतेपद मिळविले.

रेयालसाठी पुन्हा एकदा रोनाल्डोच हिरो ठरला. विश्रांतीनंतर आठ मिनिटांनी मिळालेल्या फ्री-किकवर रोनाल्डोने ग्रेमिओच्या बचावाची भिंत भेदली. रेयालने पाचव्यांदा क्‍लब विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली. 

रोनाल्डो म्हणाला, ‘‘आम्हाला या वेळी जिंकायचेच होते. आम्ही एका मोसमात एकदाही पाच स्पर्धा जिंकलेल्या नव्हत्या. आम्ही सर्वोत्तम खेळ केला.’’

उपांत्य फेरीत रेयालच्या विजयाचा हिरो ठरल्यानंतरही गॅरेथ बेल याला अंतिम सामन्यात रेयालने राखीव खेळाडूत ठेवले होते. प्रशिक्षक झिदान यांनी या वर्षी जूनमध्ये युवेंटसला हरवून चॅंपियन्स लीगचे विजेतेपद मिळविणारा संघच या सामन्यात खेळविण्याचा निर्णय घेतला. ग्रेमिओनेदेखील कोपा लिबेर्टाडोअर्स स्पर्धा जिंकताना खेळविलेला संघ कायम ठेवला. अंतिम सामन्यात रेयालने चेंडूवर सर्वाधिक ताबा मिळविला असला, तरी त्यांना उपांत्य फेरीत केलेल्या खेळाचे प्रदर्शन करता आले नाही. उत्तरार्धात रोनाल्डोने फ्री-किकवर गोल करून आघाडी मिळवली. ग्रेमिओकडून या फ्री-किकसाठी आव्हान देण्यात आले. त्यांनी सर्गी रामोस ऑफसाइड असल्याचा दावा केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT