क्रीडा

जमशेदपूरचा पहिलावहिला विजय

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पदार्पण करणाऱ्या जमशेदपूर एफसीने पहिल्यावहिल्या विजयाची प्रतीक्षा अखेर चौथ्या सामन्यात संपुष्टात आणली. जमशेदपूरने येथील नेहरू स्टेडियमवर यजमान दिल्ली डायनॅमोजला एकमेव गोलने हरविले. स्पर्धेतील पहिल्यावहिल्या गोलसह पहिला विजय संपादन करीत जमशेदपूरने तीन गुण वसूल केले.

या कामगिरीसह जमशेदपूरचे सहा गुण झाले. त्यांनी गुणतक्‍त्यात पाचवे स्थान गाठले. पहिल्या पाचही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. दिल्ली तीन गुणांसह नवव्या स्थानावर आहे. घरच्या मैदानावरील निकाल दिल्लीसाठी धक्कादायक ठरला. दिल्लीने चेंडूवर तब्बल ७१ टक्के वर्चस्व राखले होते, पण त्यांना अखेरपर्यंत अर्थपूर्ण चाल रचता आली नाही.

पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला. त्यानंतर उत्तरार्धात पेनल्टी दवडल्यानंतर जमशेदपूरने काही मिनिटांत खाते उघडले. नायजेरियाच्या इझू अझुकाने ६१व्या मिनिटाला हा बहुमोल गोल केला. हा जमशेदपूरचा स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. या लढतीपूर्वी दहा संघांमध्ये केवळ जमशेदपूरलाच गोलची प्रतीक्षा संपुष्टात आणता आली नव्हती. बाहेरील मैदानावर ही कामगिरी अझुकाने नोंदविली. हा गोल फ्री-कीकवर झाला. मेहताब होसेन यो फ्री-कीक घेत चेंडू पुरेशा उंचीने मारला. त्यावर अझुकाने अप्रतिम हेडिंग केले. मेहताब पूर्वार्धात जायबंदी झाला होता.

त्याने गोल करता सर्वप्रथम आंद्रे बिके त्याचे अभिनंदन करण्यासाठी धावला. याचे कारण बिकेने आधी पेनल्टी किक दवडली होती. ५७व्या मिनिटाला जमशेदपूरला ही पेनल्टी बहाल करण्यात आली. प्रतीक चौधरीने अझुका याला पाडले होते. त्यामुळे ही पेनल्टी बहाल करण्यात आली होती. ती घेण्यासाठी बिके पुढे सरसावला. त्याने नेटच्या डाव्या कोपऱ्यात मैदानालगत चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण उजव्या पायाने मारलेल्या फटक्‍यात अचूकता, ताकद नव्हती. त्यामुळे दिल्लीचा गोलरक्षक अल्बीनो गोम्सने उजवीकडे झेप टाकत सहज चेंडू अडविला.

पूर्वार्धात ३९व्या मिनिटाला दिल्लीचा विनीत राय आणि जमशेदपूरचा मेहताब होसेन यांच्यात चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चुरस झाली. त्यात मेहताबची धडक बसून विनीतच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. 

निकाल
दिल्ली डायनॅमोज - ० पराभूत विरुद्ध जमशेदपूर एफसी - १ (इझु अझुका ६१)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT