क्रीडा

लौकिक राखण्यास भारतीय कबड्डी संघ सज्ज

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कमालीच्या थंड असलेल्या, तसेच इराणच्या पारंपरिक वातावरणाशी सामना करीत भारतीय कबड्डी संघ आशिया कप स्पर्धेस सज्ज झाले आहेत. उद्यापासून (ता. २४) सुरू होत असलेल्या या स्पर्धेच्या सलामीच्या दिवशी भारतीय पुरुष संघ एक; तर महिला संघ दोन लढती खेळणार आहे. अर्थात, गटातील साखळी लढती भारतीयांसाठी सराव सामनेच असतील. 

गॉर्गन हे इराणमधील भूमध्य सागराजवळील थंड हवेचे ठिकाण आहे. तिथे सध्या थंडी वाढत आहे. ही स्पर्धा तिथे नव्यानेच तयार झालेल्या क्रीडा संकुलात होईल. इराण या स्पर्धेद्वारे या संकुलाची स्पर्धा संयोजनासाठी चाचणी घेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यातही पुरुष व महिलांच्या स्पर्धेसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तीन दिवसांत स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान असल्यामुळे संयोजकांनी उद्‌घाटनापूर्वी लढती घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे भारत - इराक ही पुरुषांची लढत उद्‌घाटनापूर्वी होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार १० वाजता होईल.

भारतीय महिलांच्या पहिल्या दिवसाच्या दोन लढती तैवान (दुपारी ४) व थायलंडविरुद्ध (रात्री ८.३०) होतील. सहभागी संघाचे लक्ष्य प्रामुख्याने भारताविरुद्धचा सामना हेच आहे. त्यातून आपल्याला शिकायला मिळणार. त्याचबरोबर भारतास हरवले, तर त्याचा चांगलाच फायदा होणार याची त्यांना कल्पना आहे. तुर्कमेनिस्तानची लुथेन कुल्बायेवा हिने या स्पर्धेत भारत व इराणच्या लढती हा आमच्यासाठी अभ्यासच असेल, असे सांगितले आहे. 

भारतीय संघांना आपण संभाव्य विजेते असल्याची जाणीव आहे. आम्ही नक्कीच विजय गृहीत धरणार नाही. संघाच्या सोनिपत येथे झालेल्या २१ दिवसांच्या शिबिराचा आम्हाला फायदा होईल, असे भारतीय महिला संघाच्या मार्गदर्शिका बनानी साहा यांनी सांगितले. 

टीव्ही रिप्लेचाही वापर
या स्पर्धेत प्रो कबड्डीचे नियम आहेत. त्याचबरोबर पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची संधी असणार आहे. अर्थातच प्रत्येक संघाला दोनदा अपील करता येईल. अपील वैध ठरल्यास ती संधी कायम राहील. या स्पर्धेसाठी प्रामुख्याने इराणमधीलच पंच आहेत. या सर्व पंचांचे खास शिबिर स्पर्धेच्या आदल्या दिवशी घेण्यात आले. त्यात प्रो कबड्डीतील नियमांची उजळणी घेण्यात आली. पुरुषांच्या स्पर्धेसाठी ३६; तर महिलांच्या स्पर्धेसाठी २६ पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT