क्रीडा

भारताच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारताच्या मीराबाई चानू हिने जागतिक विक्रमासह जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. कर्णम मल्लेश्‍वरीनंतर अशी कामगिरी करणारी मीराबाई केवळ दुसरीच वेटलिफ्टर ठरली. 

अमेरिकेत ॲनाहेम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मीराबाईने एकूण १९४ किलो वजन उचलून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. तिने स्नॅच प्रकारात ८५ आणि क्‍लिन अँड जर्क प्रकारात १०९ किलो वजन उचलले. तिने थायलंडच्या सुकचारोएन थुन्या हिला (१९३) अवघ्या एका किलोने मागे टाकले. सेग्युरा ॲना (१८२ किलो) ब्राँझपदकाची मानकरी ठरली. 

चानू ४८ किलो वजनी प्रकारात सहभागी झाली होती. तिची सुरवात (८५ किलो) समाधानकारक होती. मात्र, नंतर तिने १०९ किलो वजन उचलून जाणकारांचे अंदाज चुकवत सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारी ही भारताची दुसरी खेळाडू ठरली. यापूर्वी कर्णम मल्लेश्‍वरी हिने अशी कामगिरी १९९४ आणि १९९५ मध्ये केली होती. 

गेल्या वर्षी रियो ऑलिंपिक स्पर्धेत मीराबाईची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्या वेळी ४८ किलो वजनी गटात ती सर्वांगीण किमान कामगिरीपर्यंतही पोचू शकली नव्हती. क्‍लीन अँड जर्क प्रकारात ती तीन प्रयत्नांत साधे वजनही उचलू शकली नव्हती. 

त्यानंतर या वर्षी सप्टेंबरमध्ये चानूने राष्ट्रकुल अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली होती.

भारताची आणखी एक आघाडीची खेळाडू कुंदराणी देवी हिने कारकिर्दीत अनेक पदके मिळविली. यात रौप्यपदकांचा अधिक वाटा होता. पण, जागतिक स्पर्धेत ती १९८९ ते १९९९ या कालावधीत सहभागी झाली होती. मात्र, कधीही ती सुवर्णपदकापर्यंत पोचू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT